दारूच्या वाहतुकीला आळा बसण्यासाठी जिल्ह्यात ४ पथके

ढाब्यावर परवाना न घेता दारू पिणार्‍यांवर होणार कारवाई

रत्नागिरी – दारू पिण्याचा परवाना न घेता थर्टीफर्स्टला (३१ डिसेंबरला) ढाब्यावर किंवा ‘हॉटेल’मध्ये दारू पिणारे आणि त्यांना दारू पुरवणारे यांच्यावर उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष असणार असून अशांवर गुन्हा नोंद होऊन कारवाई होईल, अशी माहिती  उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर धोमकर यांनी दिली. त्यासमवेत दारूच्या वाहतुकीलाही आळा बसण्यासाठी जिल्ह्यात ४ पथके तैनात ठेवण्यात आली आहेत.

उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर धोमकर यांनी सांगितले की,

१. जिल्ह्यात ४ पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये मंडणगड आणि दापोली या तालुक्यांसाठी १, चिपळूण अन् गुहागर यांसाठी १, रत्नागिरी आणि संगमेश्‍वर यांसाठी १ अन् लांजा आणि राजापूर यांसाठी १ पथक कार्यरत आहे.
२. सिंधुदुर्गमध्ये राज्यातून आणखी ४ पथके तैनात ठेवली आहेत.
३. थर्टीफर्स्टच्या पार्श्‍वभुमीवर परराज्यातून होणारी दारू वाहतूक, हातभट्टीत निर्मिती होणारी दारू, हातभट्टीची विक्री, गोवा बनावटीची दारू विक्री यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.