विदेशातील व्यक्तींनाही सहजतेने जाणवणारे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अलौकिकत्व !

इंडोनेशियामध्ये श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या तेजस्वी चर्येकडे आकर्षित होऊन स्थानिकांनी त्यांच्यासमवेत छायाचित्रे काढून घेणे

इंडोनेशियातील महिलांनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासमवेत छायाचित्र काढून घेतले, तो क्षण !

विदेशातील हिंदु संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी आम्ही ९.३.२०१८ या दिवशी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यासमवेत इंडोनेशिया देशात गेलो होतो. तेथील ऐतिहासिक स्थळे पहातांना अनेक लोक श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासमवेत त्यांचे छायाचित्र काढून घ्यायचे.

इंडोनेशियातील विद्यार्थिनींनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची आपल्या वहीत स्वाक्षरी घेतली !

‘योग्यकर्ता’ शहरात सुलतानाच्या राजवाड्यात एक शालेय सहल आली होती. त्या विद्यार्थ्यांनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंसमवेत छायाचित्रे काढून घेतली, तसेच त्यांच्या वहीत श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची स्वाक्षरी घेतली.

– श्री. विनायक शानभाग, रामनाथी, गोवा. (९.११.२०२२)


श्रीलंकेत सीतामातेने अग्नीपरीक्षा दिलेल्या स्थानी असलेल्या व्यवस्थापकांनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या सीतामातेसारख्या दिसत असल्याचे सांगणे

मंदिराचे कुलुप उघडतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, त्यांच्या मागे मंदिराचे व्यवस्थापक

‘श्रीलंकेत सीतामातेने अग्नीपरीक्षा दिलेले स्थान आहे. श्रीलंकेतील अनेक हिंदूंनाही या स्थानाविषयी माहिती नाही. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंच्या समवेत हे स्थान शोधत-शोधत गुरुकृपेने आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. बाहेर बौद्ध भिक्कू आणि त्या मंदिराचे वयोवृद्ध बौद्ध व्यवस्थापक आम्हाला भेटले. त्या वेळी व्यवस्थापक आजोबा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांच्याकडे पाहून म्हणाले, ‘‘तुम्ही कुणीतरी दैवी स्त्री आहात’, असे मला वाटते. मी येथे गेल्या ५० वर्षांपासून काम करत आहे. आजपर्यंत आमच्याकडे तुमच्यासारखे कुणी आले नव्हते. तुमच्याकडून मी प्रवेश तिकिटाचे पैसे घेणार नाही. समवेत असलेल्यांचे तेवढे पैसे घेईन.’’

ते आजोबा आम्हाला सीतामातेने अग्नीपरीक्षा दिलेल्या मंदिराकडे घेऊन गेले. तेथे प्रवेशद्वार बंद होते. आजोबा म्हणाले, ‘‘माताजी, तुम्ही मला साक्षात सीतामातेसारख्या दिसता. आजपर्यंत मी कुणालाही या मंदिराची किल्ली दिलेली नाही. आज या सीतामातेच्या मंदिराची किल्ली मी तुम्हाला देतो. तुम्हीच टाळे (कुलूप) उघडा.’’ आजोबांनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंना ती किल्ली दिली. दोन हातांत धरावी लागते, एवढी ती किल्ली होती. किल्ली हातात घेताच श्रीचित्‌‌शक्ति गाडगीळ काकूंना भावाश्रू आले.

– श्री. विनायक शानभाग, गोवा. (९.११.२०२२)