झारखंडच्या खुंटी जिल्ह्यात धर्मांधाकडून अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार

खुंटी – झारखंडमधील खुंटी जिल्ह्यातील जरियागढ भागात एका धर्मांधाने हिंदु आदिवासी समाजातील १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. आरोपीही अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित मुलगी दहावीत शिकते. आरोपीने मुलीवर चार वेळा बलात्कार केला. मुलगी गरोदर राहिल्यानंतर ही गोष्ट उघडकीस आली. पीडितेच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी धर्मांधाला ५ सप्टेंबर या दिवशी अटक केली. पीडित मुलगी ४ मासांची गर्भवती आहे. या प्रकरणी अन्वेषण चालू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अमन कुमार यांनी दिली.