गुरुपौर्णिमेच्या संदर्भात सप्तर्षींचा संदेश

पू. डॉ. ॐ उलगनाथन्

‘१३.७.२०२२ या दिवशीच्या गुरुपौर्णिमेची पंचमहाभूते वाट बघत होती. गुरुदेव ‘दत्तात्रेयाच्या’ रूपात आल्याने सर्व देवता आणि ऋषिमुनी यांना आनंद झाला. आता निसर्ग त्याचा खेळ दाखवणार आहे. सुदर्शनचक्र निसर्गाच्या रूपात कार्य करणार आहे. सर्वत्र विनाशच विनाश आहे.

आतापर्यंत झालेले सर्व ‘जन्मोत्सव’ आणि ‘गुरुदेवांशी संबंधित कार्यक्रम’ यांमध्ये आजचा कार्यक्रम सर्वाधिक निर्गुण स्तरावर झाला. आज अनेक साधकांचे ध्यान लागले.’

– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून १३.७.२०२२, संध्याकाळी ६.०१)