हिंदु मक्कल कच्छीच्या (हिंदु जनता पक्षाच्या) कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ग्रंथ आणि फलक प्रदर्शन

ईरोड (तमिळनाडू) – हिंदु मक्कल कच्छीचे नेते श्री. अर्जुन संपथ यांनी ईरोड येथे त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी २६ जून या दिवशी राज्यस्तरीय बैठक आयोजित केली होती. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ग्रंथ आणि फलक यांचे प्रदर्शन लावण्यात आले.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना श्री. अर्जुन संपथ

हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते सर्वश्री सर्वानन् आणि गोपाळकृष्णन् यांनी या सेवेत सहभाग घेतला. या कार्यक्रमात राज्यभरातील २५० ते ३०० कार्यकर्ते सहभागी झाले होते. श्री. अर्जुन संपथ यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी विस्तृत माहिती सांगितली.

कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेले फ्लेक्स फलक
ग्रंथप्रदर्शन पहातांना हिंदु मक्कल कच्छीचे कार्यकर्ते

हिंदु जनजागृती समितीच्या ग्रंथप्रदर्शनाला उपस्थितांपैकी अनेक जणांनी भेट देऊन ग्रंथांविषयी माहिती जाणून घेतली. तसेच काही जणांनी ग्रंथ विकतही घेतले. कार्यक्रमस्थळी फलक प्रदर्शनही लावण्यात आले होते. त्याला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.