‘श्री. राजेंद्र भट गेल्या दीड दशकापासून प्रयोगशील शेती करतात. शेतभूमीचा कस वाढावा, यासाठी पार्थिव गणेशाची पूजा करण्याची पुराणातील परंपरा भट यांच्या वाचनात आली. १ एकर शेतीसाठी साधारण १० किलो शेण-माती, पाव किलो तूप, अर्धा किलो मध आदींचे मिश्रण करून ते काही कालावधीसाठी एकत्र झाकून ठेवले, तर त्याचे रसायन बनते. हे रसायन पाण्यात विरघळवून शेतात टाकल्यास पिकांची वाढ झपाट्याने होते आणि उत्पन्नाचा कसही वाढतो, ही खरी पद्धत; पण तिला पार्थिव गणेशमूर्तीच्या पूजनाची जोड दिली गेली. माती आणि शेण यांचा गोळा बनवायचा, त्याला पार्थिव गणेशाचा आकार द्यायचा. या मूर्तीवर मध, तूप यांचा अभिषेक करायचा. त्यानंतर या मूर्तीवर विविध झाडांची पत्री वाहून पूजा करायची म्हणजेच आच्छादन करायचे. ठराविक कालावधीनंतर या मूर्तीचे पाण्यात विसर्जन करून ते पाणी शेतात टाकायचे. या पाण्यामुळेच शेताला रसायन मिळते. या रसायनाचा वापर केल्याने केवळ ३ वर्षांत भूमीची प्रत सुधारल्याचा अनुभव आल्याचे ते सांगतात.’
(संदर्भ : दैनिक ‘सकाळ’, टुडे पुरवणी, १०.२.२०११)