हायड्रोजन बाँबद्वारे होणारे आक्रमण अधिक विनाशकारी !

हायड्रोजन बाँब

हायड्रोजन बाँब हा अणूबाँबपेक्षा १ सहस्र पटींनी विनाशकारी आहे. याची शक्ती हवी त्या प्रमाणात वाढवून अधिकाधिक विनाश करता येतो. जेव्हा हा बाँब फोडायचा असतो, तेव्हा त्याच्या समवेत अणूबाँबही असतो. प्रथम अणूबाँब फुटतो आणि मग त्याच्या उष्णतेने हायड्रोजनचे अणू एकमेकांशी जोडले जातात. म्हणून याला ‘फ्युजन बाँब’ असेही म्हणतात. हे अणू जोडले जाऊन एक पूर्ण मोठा गोळा बनतो आणि तो ‘हिलीयम’ वायूमध्ये रूपांतरित होतो. अमेरिका, युनायटेड किंगडम, चीन, फ्रान्स, रशिया, दक्षिण कोरिया, इस्रायल आणि भारत या देशांकडे हायड्रोजन बाँब आहे.