गंगावरम् येथे राममंदिरात घुसून धर्मांध ख्रिस्त्यांनी केली येशूला प्रार्थना !

  • ख्रिस्तीबहुल होत चाललेल्या आंध्रप्रदेशातील घटना !

  • भाजपचे नेते सुनील देवधर यांनी घटनेचा व्हिडिओ ट्वीट करून केला दावा !

  • पोलिसांनी दावा फेटाळला !

  • जर या घटनेत तथ्य असेल, तर यातून धर्मांध ख्रिस्त्यांची मजल कुठपर्यंत गेली आहे, हे लक्षात येते. भविष्यात आंध्रप्रदेश ख्रिस्तीबहुल झाल्यास आश्‍चर्य ते काय ? स्वातंत्र्यवीर सावकर यांनी सांगितल्यानुसार ‘धर्मांतर हेच राष्ट्रांतर आहे’, हे लक्षात घेऊन हिंदूंनो, आतातरी संघटित व्हा आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
  • ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आंध्रप्रदेशात ख्रिस्त्यांना धर्मांतरासाठी मोकळे रान मिळाल्याचे आरोप वारंवार होत आले आहेत. अशात त्यांच्याच पोलिसांकडून ‘अशी घटना घडलीच नाही’, असे म्हणत दावे फेटाळण्यात येणे, यात काय आश्‍चर्य ?
आंध्र प्रदेशातील हिंदू मंदिरावर ख्रिश्चनांचा ताबा; गर्भगृहासमोर प्रार्थना सभेचे आयोजन

भाग्यनगर (आंध्रप्रदेश) – आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा ही राज्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांचा गड बनत चालली आहेत. गेल्या वर्षी आंध्रप्रदेशातील सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाचे खासदार रघू रामकृष्ण राजू यांनी राज्यात ख्रिस्त्यांची संख्या तब्बल २५ टक्के झाली आहे, हे सोदाहरण स्पष्ट केले होते. आता राज्यातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात असलेल्या गंगावरम् येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांनी एका मंदिरामध्ये घुसून येशूला प्रार्थना केल्याची घटना समोर आली आहे. ३१ मार्च या दिवशीचा यासंदर्भातील एक व्हिडिओ ‘व्हायरल’ (मोठ्या प्रमाणात प्रसारित) झाल्यावर ही घटना उजेडात आली.

आंध्रप्रदेशातील भाजपचे प्रभारी आणि राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. त्यामध्ये एका पाद्य्राच्या नेतृत्वाखाली ख्रिस्त्यांचा एक समूह गंगावरम् गावातील राम मंदिरात प्रार्थना करत असल्याचे दिसत आहे. जिथे पाद्री बसला आहे, त्याच्या पाठीमागे प्रभु श्रीरामचंद्रांची गर्भगृहातील मूर्ती दिसत आहे. चर्चने त्याची सीमा सोडून अवैध पद्धतीने राम मंदिरावर नियंत्रण मिळवले आहे आणि ख्रिस्ती परंपरांचे पालन करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. देवधर यांनी सर्व आरोपी ख्रिस्त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर ‘त्यांच्या राज्यात हिंदूंचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतरणाचे षड्यंत्र मोठ्या प्रमाणात राबवले जात आहे’, असा आरोपही देवधर यांनी केला. भाजपचे वरिष्ठ नेते विष्णु वर्धन रेड्डी यांनीही या घटनेचा निषेध करत आंध्रप्रदेशात हिंदूंना कोणतेच स्थान नसल्याचे म्हटले आहे.

(म्हणे) ‘खासदार देवधर यांच्या दाव्यात तथ्य नाही !’ – पोलीस

दुसरीकडे पूर्व गोदावरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्रनाथ बाबू यांनी खासदार देवधर यांनी केलेल्या आरोपांना निराधार असून त्यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे, अशी माहिती ‘द हिंदू’ने दिली आहे.