मंदिरांच्या संदर्भात अन्य पंथियांनी केलेले अपप्रकार, त्यांचे दुष्परिणाम आणि हे अपप्रकार करण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव !

‘विदेशात आणि भारतात अनेक ठिकाणी प्राचीन मंदिरे नष्ट करून तेथे अन्य पंथीय त्यांची प्रार्थनास्थळे बांधतात. अन्य पंथीय लोक हिंदूंच्या अनेक देवतांची मंदिरे पूर्णपणे उद्ध्वस्त न करता तेथे नवीन बांधकाम करून प्रार्थनास्थळे बनवतात, तर काही वेळा मंदिरे भुईसपाट करून त्यांची जागा पूर्णपणे कह्यात घेऊन तेथे नवीन बांधकाम करून प्रार्थनास्थळे बांधतात. ‘मंदिरांच्या संदर्भात अन्य पंथियांनी केलेले अपप्रकार आणि त्यांचे दुष्परिणाम’ यांच्या संदर्भात सनातन संस्थेचे साधक श्री. संजय मुळ्ये (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६४ वर्षे) यांनी विचारलेल्या प्रश्नांना देवाने मला दिलेल्या ज्ञानमय उत्तरांतून अशा घटनांमागील उलगडलेला आध्यात्मिक कार्यकारणभाव येथे लेखबद्ध केला आहे. यातील काही भाग १६ मार्च २०२५ या दिवशी प्रसिद्ध झाला. आज पुढिल भाग येथे दिला आहे.                                                                                        (भाग ३)

या लेखातील भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/893143.html

६. भ्रष्ट मंदिरे पुन्हा मूळ स्वरूपात आणली किंवा जीर्णाेद्धारासारखा प्रयत्न केला, तर हिंदु समाजाला कोणता लाभ होतो ? 

उत्तर : भ्रष्ट मंदिरे पुन्हा मूळ स्वरूपात आणण्यासाठी प्रथम ‘त्या वास्तू अन्य पंथियांची प्रार्थनास्थळे नसून मूळ हिंदूंची मंदिरे किंवा वेदपाठशाळा किंवा धार्मिक ग्रंथालये होती’, हे न्यायालयात पुराव्यानिशी सिद्ध करावे लागते. यासाठी न्यायालयीन लढा द्यावा लागतो. भारतातील सर्वाेच्च न्यायालयातील पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी ही बाबरी ढाचा नसून मूळ हिंदूंचे आराध्य असणारे प्रभु श्रीरामाचे जन्मस्थान असल्याचे अनेक वर्षे न्यायालयीन लढा देऊन सिद्ध केले. त्यामुळे अयोध्येतील वादग्रस्त असणार्‍या श्रीरामजन्मभूमीत वर्ष २०२४ मध्ये भव्य श्रीराममंदिराची स्थापना करण्यात आली. त्याचप्रमाणे ‘काशी येथील ज्ञानवापी परिसर हे मूळ ज्ञानवापी शिवाचे मंदिर आहे’, हे  पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांचे सुपुत्र आणि सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता श्री. विष्णु शंकर जैन हे पुरावे एकत्र करून न्यायालयीन लढा देत आहेत. अशा धर्माभिमानी आणि योद्धा अधिवक्त्यांमुळेच भारतातील अन्य पंथियांनी अतिक्रमण केलेली हिंदूंची मंदिरे मुक्त होऊन अन् त्यांचा जीर्णाेद्धार होऊन त्यांना मूळ स्वरूप प्राप्त होत आहे. यासाठी अशा योद्धा धर्मवीर अधिवक्त्यांप्रती हा हिंदु समाज आजन्म कृतज्ञ राहील. अशी मंदिरे पुन्हा मूळ स्वरूपात आणली, म्हणजे त्यांचा जीर्णाेद्धार किंवा पुनर्स्थापना करण्याचा प्रयत्न केला, तर हिंदु समाजाला होणार्‍या लाभाचे स्वरूप आणि प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

६ अ. लाभांचा स्तर, देवळात येणार्‍या किंवा त्याच्या परिसरात असणार्‍या भाविकाला होणार्‍या लाभांचे स्वरूप आणि देवळात येणार्‍या किंवा त्याच्या परिसरात असणार्‍या भाविकाला होणार्‍या लाभांचे प्रमाण

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याची वेळ आणि टंकलेखन करण्याची वेळ ३०.१.२०२५ दुपारी ३.१५ ते ३.४०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.