दैनिक ‘सनातन प्रभात’ विषयीची संतवाणी !

‘सनातन प्रभात’ म्हणजे सामान्य नियतकालिक नव्हे, तर प्रतिदिन प्रकाशित होणारा अद्वितीय ग्रंथच !

दैनिक ‘सनातन प्रभात’ प्रत्येक हिंदूच्या घरात गेले, तर धर्मजागृती व्यवस्थित होईल ! – प.पू. स्वामी कृष्णानंद सरस्वती, मठाधिपती, श्री रामदास आश्रम, बदलापूर, ठाणे

प.पू. स्वामी कृष्णानंद सरस्वती

भारतात वेगवेगळ्या संघटना हिंदूसंघटनासाठी कार्य करत आहेत. हिंदु राष्ट्रापर्यंत पोचण्याचा प्रत्येकाचा मार्ग आणि गुणवैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत. असे असले, तरी सर्वांनी संघटितपणे कार्य करायला हवे. गुरुजी (परात्पर गुरु डॉ. आठवले) ईश्वरप्राप्ती, संस्कार आणि अध्यात्म या मार्गाने हिंदूंना हिंदु राष्ट्रापर्यंत घेऊन जात आहेत. यामध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’चे योगदान मोठे आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’चा प्रवास खडतर आहे, तरीही कुठेही न डगमगता दैनिकाचा प्रवास चालू आहे. प्रत्येक हिंदूच्या घरात हे दैनिक गेले पाहिजे, तरच धर्मजागृती व्यवस्थित होईल. ‘सनातन प्रभात’ घराघरांत जाण्यासाठी मी प्रार्थना करीन. या कार्याला माझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेत.

प्रत्येक हिंदूने न थांबता धर्मकार्य करत रहायला हवे !

मुसलमान दिवसांतून ५ वेळा नमाज पडतात, तर ईसाई रविवारी चर्चमध्ये जातात. तेथे गेले नाही, तर त्यांच्या अंत्यविधीसाठी जागाही दिली जात नाही. याउलट हिंदूंनी धर्माचरण केले नाही, तर हिंदु धर्मात त्यांना दुहीची वागणूक दिली जात नाही. याविषयी कृतघ्न असल्याने हिंदूंची स्थिती दयनीय झाली आहे. कित्येक हिंदूंना नमस्कार करण्याची पद्धतही ठाऊक नसते. धर्मशिक्षण नसल्यामुळे हिंदू संस्कारहीन झाला आहे. धर्मज्ञान नसल्यामुळे आपण संघटित राहिलो नाही. इंग्रजांच्या भाषेचा स्वीकार करून आपण अद्यापही इंग्रजांची गुलामगिरी करत आहोत. त्यापेक्षा सगळ्यांनी भारतातील सर्व भाषा शिकल्या पाहिजेत. त्यामुळे ज्ञानाची देवाणघेवाण सहज शक्य आणि सोपी होईल. परिवर्तन हा जगाचा नियम आहे. परिवर्तन झाले, तर तुमची प्रगती आहे. तुम्ही योग्य मार्गाने चालला आहात. ‘प्रगती थांबली, तर ती व्यक्ती मृतावस्थेत आहे’, असे समजा. त्यामुळे प्रत्येकाने न थांबता धर्मकार्य करत राहिले पाहिजे.


राष्ट्र-धर्म यांविषयी वृत्त देतांना दैनिक ‘सनातन प्रभात’ तडजोड करत नाही, याचा अभिमान वाटतो ! – पू. मोडक महाराज, संस्थापक, श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट, कल्याण, जिल्हा ठाणे

पू. मोडक महाराज

‘सनातन प्रभात’ हे देव, देश आणि धर्म यांविषयी परखड विचार मांडणारे दैनिक आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’ राष्ट्र आणि धर्म यांविषयी वृत्त देतांना कुठेही तडजोड करत नाही, याचा पुष्कळ अभिमान वाटतो. भारत हिंदु राष्ट्र करण्यासाठी भारतातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र करून महासंघटन करावे, यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’ सातत्याने लिखाण करते. या प्रयत्नांना ईश्वर अवश्य यश देईल. हिंदूंच्या देवता, हिंदु राष्ट्र, हिंदु धर्म यांसाठी चांगल्या प्रयत्नांना यश मिळो आणि भारत हिंदु राष्ट्र होवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !