गडांवरील अवैध थडगी आणि प्रार्थनास्थळे हटवून ‘लँड जिहाद’ रोखा ! – शिवप्रेमींची मागणी

ट्विटरवर शिवप्रेमींचा ‘#SaveForts_OpposeLandJihad’ हा ‘हॅशटॅग’ (एकाच विषयावर घडवून आणलेली चर्चा) चतुर्थ स्थानी !

अशी मागणी का करावी लागते ? सरकार स्वतःहून अशा अवैध बांधकामांवर कारवाई का करत नाही ? – संपादक

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-दुर्गांवरील अवैध थडगी आणि प्रार्थनास्थळे हटवून ‘लँड जिहाद’ रोखावा, अशी मागणी शिवप्रेमींनी केली. या मागणीसाठी शिवप्रेमींनी ‘टि्वटर’वर चालवलेला ‘#SaveForts_OpposeLandJihad’ (गड वाचवा, ‘लँड जिहाद’ला विरोध करा) हा ‘हॅशटॅग’ राष्ट्रीय पातळीवर चतुर्थ स्थानी पोचला होता.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड-दुर्ग म्हणजे हिंदवी स्वराज्याचा ऐतिहासिक वारसा आहे. तथापि आज धर्मांधांनी अनेक गड-दुर्गांवर अवैध थडगी आदींचे बांधकाम केले आहे. कालांतराने याचे रूपांतर दर्ग्यात होते. रायगडावरही धर्मांधांनी अशा प्रकारे अवैध प्रार्थनास्थळ उभारल्याचे नुकतेच उघडकीस आले होते. असाच प्रकार कुलाबा, शिवडी, मानगड आदी गडांवरही नुकताच आढळून आला आहे. हा प्रकार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-दुर्गांचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्र आहे.

हिंदु जनजागृती समिती आयोजित विशेष मराठी संवाद पहा – 

गड-दुर्गांवर इस्लामी अतिक्रमण ! पुरातत्त्व खाते करतेय काय ?

ही सर्व अवैध बांधकामे त्वरित हटवावीत, तसेच संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अशा मागण्या शिवप्रेमींनी या वेळी केल्या. या ‘टिवटर ट्रेंड’मध्ये ४५ सहस्रांहून अधिक ‘टिवट्स’ करण्यात आले. याचसह ‘मजार जिहाद’ हा ‘हॅशटॅग’ही ‘ट्रेंड’ होत होता. त्यामध्ये १८ सहस्रांहून अधिक ‘टिवट्स’ करण्यात आले.