सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळत असलेले; परंतु समजण्यास कठीण असणारे अपूर्व ज्ञान !

रविवारपासून नवीन लेखमाला !

परात्पर गुरु डॉ. आठवले

गेली १५ वर्षे अर्थ न कळणार्‍या कठीण ज्ञानाच्या काही धारिकांचा ‘अर्थ कळावा’, ही इच्छा देवाने ३.११.२०२१ या दिवसापासून पूर्ण करणे : ‘ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळणार्‍या ज्ञानातील काही कठीण ज्ञान समजून घेण्याची माझी क्षमता नसल्याने त्या ज्ञानाच्या २५ धारिका मी गेल्या १० – १५ वर्षांत मध्ये मध्ये पडताळण्याचा प्रयत्न केला; परंतु त्या पडताळतांना त्रास होत असल्यामुळे मी त्या न पडताळता बाजूला ठेवल्या होत्या. ३.११.२०२१ या दिवशी त्यासंदर्भात माझ्या मनात विचार आला, ‘ज्ञान न कळण्याचे कारण काहीही असो, ईश्वराला सगळे समजते, तर मग ईश्वर मला समजावून का सांगत नाही ?’ नंतर माझ्या मनात विचार आला, ‘त्या धारिका पुन्हा एकदा वाचून बघूया.’ तेव्हापासून मी धारिका वाचायला आरंभ केला आणि मला त्या समजू लागल्या.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.११.२०२१)


या लेखमालेच्या माध्यमातून ‘सूक्ष्मातील ज्ञान कसे असते ?’ ‘त्यातील ज्ञान अन् त्याची भाषा कशी असते ?’ ‘ज्ञान कळल्यानंतर त्यातील आनंद कसा असतो ? हे वाचकांनाही कळावे’, या उद्देशाने हे ज्ञान प्रकाशित करणार आहोत. ‘दैनिक सनातन प्रभात’ जागेच्या मर्यादेमुळे येथे पूर्ण ज्ञान प्रसिद्ध करणे शक्य नाही. यासाठी येथे केवळ प्रत्येक विषयाची अनुक्रमणिका देणार आहोत आणि त्या संदर्भातील सविस्तर ज्ञान संकेतस्थळावर प्रकाशित करणार आहोत.