जगातील घटस्फोटांचे प्रमाण
जगातील घटस्फोटांचे प्रमाण अत्यधिक असलेल्या पहिल्या दहा देशांची नावे पाहिली, तर ते सर्व देश आर्थिकदृष्ट्या प्रगत (विकसित) आहेत. याउलट घटस्फोटांचे प्रमाण न्यूनतम असणार्या पहिल्या दहा देशांची नावे पाहिली, तर हे सर्व देश आर्थिकदृष्ट्या कमी प्रगत (कमी विकसित) आहेत. प्रगत देशांतील विकासाचा केंद्रबिंदू आर्थिक असल्याने, तेथे संस्कृती, कुटुंबपद्धत यांचे स्थान दुय्यम असते. पर्यायाने तेथे स्वैराचार अधिक वाढतो.
याउलट कमी प्रगत देशांत संस्कृती, परंपरा, आचार-विचार यांचे मूल्य अधिक असते. ज्या देशांत ‘आर्थिक विकास’ हा प्रगतीचा केंद्रबिंदू नसून परंपरा, संस्कृती, तसेच आचारमूल्यांची मुळे घट्ट असतील, तोच देश खर्या अर्थाने प्रगत म्हणणे योग्य ठरते. अशा सुसंस्कृत देशांतील कुटुंबव्यवस्था बळकट असते आणि तेथील घटस्फोटांचे प्रमाणही न्यून असेल.
‘कलियुगातील आताच्या काळात ‘आधी प्रेम आणि मग वासनासुख’, असे नसून ‘आधी वासनासुख’ असते आणि नंतर ‘प्रेम असेल कि नाही’, याची खात्री नसते. त्यामुळे ‘प्रेम’ असे काहीतरी आहे’, हेही नवीन पिढ्यांना ज्ञात होत नाही. त्यामुळे पाश्चात्त्य देशांत घटस्फोट ही नेहमीची गोष्ट झाली आहे ! एखाद्या देशात घटस्फोटांचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक असल्यास त्याचे अर्थ पुढीलप्रमाणे होतात. १. एक आईस्क्रिम खाल्ल्यावर दुसर्या प्रकारचे खातात, तसे त्यांचे वैवाहिक जीवन असते. २. घटस्फोट न घेताही त्यांचे इतरांबरोबर आधीपासूनच संबंध असतात. शेवटी नाईलाज म्हणून ते घटस्फोट घेतात. ३. लग्न : काही जणांना वाटेल, ‘देवाण-घेवाण हिशोब संपल्यामुळे ते घटस्फोट घेतात आणि अनेकांबरोबर त्यांचा देवाण-घेवाण हिशोब असल्याने घटस्फोट घेऊन ते अनेक विवाह करतात. प्रत्यक्षात ते करतात, ते लग्नही नसते. नुसते एकमेकांशी संबंध ठेवता यावा; म्हणून केलेला दिखावा असतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
वर्ष २०१७ मध्ये सिडनी, ऑस्ट्रेलिया येथील ‘युनिफाईड लॉयर्स’ या कौटुंबिक खटले लढवणार्या अधिवक्त्यांच्या संघटनेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार जगातील अत्यधिक घटस्फोटांचे प्रमाण असणार्या १० देशांची आणि न्यूनतम घटस्फोटांचे प्रमाण असणार्या १० देशांची सूची पुढीलप्रमाणे आहे.
– अश्विनी कुलकर्णी, समन्वयक, आरोग्य साहाय्य समिती. (२९.३.२०१९)