गुरुपौर्णिमा महोत्सवांचे ‘ऑनलाईन’ पद्धतीने ११ भाषांत आयोजन !

‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा महोत्सवांचे ‘ऑनलाईन’ पद्धतीने ११ भाषांत आयोजन !

गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा ! कोरोना महामारीमुळे गत वर्षाप्रमाणे यावर्षीही ‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे.

२३ जुलै २०२१ या दिवशी मराठी, गुजराती, कन्नड आणि मल्ल्याळम् या भाषांत, तर २४ जुलै २०२१ या दिवशी हिंदी, पंजाबी, बंगाली, उडिया, तेलुगु, तमिळ आणि इंग्रजी या भाषांत गुरुपौर्णिमा महोत्सव ‘ऑनलाईन’ पहाता येणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती मिळण्यासाठी पुढील मार्गिकांना भेट द्या :

सनातन संस्थेचे संकेतस्थळ : www.Sanatan.org

हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ : www.HinduJagruti.org