अध्यात्मशास्त्र सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांच्या आधारे प्रत्येक धर्मशास्त्रीय कृतीचे विवेचन करते. अध्यात्मशास्त्रानुसार स्त्रीला तिच्यातील रजोगुण वाढल्याने पाळी येते. अशी स्त्री सात्त्विक व्यक्ती, स्थान, वस्तू आदींच्या संपर्कात आल्यास तिच्यातील रजोगुणाचे प्रमाण न्यून होऊन पाळी अल्प होण्याचा संभव असतो. तसे होऊ नये; म्हणूनच पाळीच्या वेळी देवळात किंवा संतदर्शनाला जाऊ नये. तसे केल्यास ३० – ३५ वर्षे वयालाच सात्त्विकतेमुळे पाळी थांबू शकते. पाळी थांबली, तर स्त्रीची प्रजननक्षमता घटते. स्त्रीमध्ये उत्तम प्रजा निर्माण करण्याचे दायित्व असल्याने तिने पाळीचे नियम पाळावेत, असा धर्मशास्त्रांचा आग्रह असतो. (संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’)