तिसर्‍या विवाहाच्या प्रयत्नामुळे संतापलेल्या पत्नीकडून ७७ वर्षांच्या मौलवी असलेल्या पतीची हत्या !

वासनांधतेचा दुष्परिणाम, असेच याला म्हणता येईल ! अशा घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने समान नागरी कायदा लवकरात लवकर आणणे आवश्यक आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथील शिकारपूर गावामध्ये ७७ वर्षीय असलेल्या एका मौलवीने (इस्लामच्या धार्मिक नेत्याने) तिसर्‍या विवाहाचा प्रयत्न चालू केला. यावर संतापलेल्या पहिल्या पत्नीने मौलवी झोपेत असतांना त्याच्या गुप्तांगावर चाकूने वार करून त्याला गंभीररित्या घायाळ केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वकील अहमद असे या मौलवीचे नाव आहे, तर हाजरा असे पत्नीचे नाव आहे. पोलिसांनी हाजरा हिला अटक केली आहे.

१. मौलवीचा घरातच मृत्यू झाल्यावर हाजरा हिने नातेवाइकांच्या साहाय्याने मौलवीचे दफन करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शेजार्‍यांना याचा संशय आल्याने त्यांनी पोलिसांना याविषयी माहिती दिली. पोलिसांनी चौकशी केल्यावर हाजरा हिने घडलेली घटना सांगून गुन्हा स्वीकारला.

२. हाजरा हिला ५ मुली असून त्यातील ४ जणींचे विवाह झाले आहेत. दुसर्‍या पत्नीने मौलवीला सोडल्यानंतर तो तिसरे लग्न करणार असल्याची त्याने हाजराला माहिती दिली होती. त्यावर तिने ‘अविवाहित मुलीचे आधी लग्न कर’, असे मौलवीला सांगितले. यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला आणि रात्री हाजराने मौलवीवर आक्रमण केले.