जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात २ पोलीस हुतात्मा, तर ३ नागरिक ठार !

काश्मीरमध्ये कितीही जिहादी आतंकवाद्यांना ठार मारले, तरी त्यांची निर्मिती करण्याचा कारखाना पाकमध्ये चालू असल्याने पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही, हेच अशा घटनांतून पुनःपुन्हा समोर येत, हे आता लक्षात घ्यायला हवे !

जिहादी आतंकवाद्यांनी केलेले आक्रमण

सोपोर (जम्मू-काश्मीर) – येथील आरोपोरा नाक्यावर जिहादी आतंकवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांच्या पथकावर केलेल्या आक्रमणात २ पोलीस हुतात्मा झाले, तर ३ स्थानिक नागरिक ठार झाले. यासह २ पोलीस घायाळ झाले आहेत. हे आक्रमण लष्कर-ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांनी केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. आतंकवाद्यांचा शोध घेण्यासाठी येथे अभियान राबवतांना नाकाबंदी करण्यात आली हाती. त्या वेळी हे आक्रमण करण्यात आले. आदल्या दिवशी काश्मीरच्या जैनपोरा येथेही आतंकवाद्यांनी सुरक्षादलांवर आक्रमण केले होते.