बांगलादेशी तरुणीवर सामूहिक बलात्कार करणार्‍या ५ बांगलादेशी तरुणांना अटक

बांगलादेशी घुसखोरांना देशातून कधी हाकलणार ?

बेंगळुरू (कर्नाटक) – येथे एका तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि अनैसर्गिक कृत्य केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी एक महिला आणि ५ बांगलादेशी तरुण यांना अटक केली. या बलात्काराचा व्हिडिओ बनवून तो सामाजिक माध्यमांतून प्रसारित करण्यात आला होता. पीडित तरुणीही बांगलादेशमधील असून तिच्यावर अत्याचार करून तिला वेश्याव्यवसायासाठी विकण्यात येणार होते, असे पोलिसांनी सांगितले. व्हिडिओ प्रसारित झाल्यावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी या आरोपींना पकडण्याचे आवाहन केले होते.