श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र – एक अभ्यास (भाग १२)

१४ व्या शतकात श्री दत्तात्रेयांचे प्रथमावतार श्रीपाद श्रीवल्लभ होऊन गेले. श्री. शंकर भट्ट या उडुपी स्थित ब्राह्मणाने त्या काळात श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र कशाप्रकारे लिहिले, त्यांना मिळालेली दैवी आज्ञा, ईश्वरनियोजित प्रवासात त्यांना मिळालेल्या विविध साक्षी, श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याशी आलेला संबंध या सूत्रांवर ‘श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र : एक अभ्यास ’ हा ग्रंथ आधारित आहे. या ग्रंथामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या समकालीन सामाजिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक परिस्थितीचा ऊहापोहही करण्यात आला आहे. हवाईदलातील निवृत्त अधिकारी आणि लेखक श्री. शशिकांत ओक यांनी या ग्रंथाचे संकलन केले आहे. हा ग्रंथ आमच्या वाचकांसाठी येथे लेख रूपाने साभार प्रकाशित करत आहोत.

प्रकरण ९ : दत्त संप्रदायातील पहिल्या तीन महाभागांची पोथी रुपाने मांडणी – वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/471057.html

परिशिष्ट १ – अवांतर जमवलेली माहिती

पोथीतून भाषा, म्हणी, वाक् प्रचार, शब्दांचे अर्थ यांची नोंद रंदक ठरेल.

मुस्लिम सत्तेचे संदर्भ, बीदरचा राजा, सायंदेवांवरील संकट,

चर्ला – पाण्याचा टँक किंवा पाणथळ जागा अली, आली – झाडी किंवा हिरवळ असलेली जागा
आडा किंवा वाडा – विजयवाडा गाव, गल्ली इप्पा, टिप्पा, टिब्बा – डोंगरावरचे ऊंच ठिकाण गिरसप्पा, लालटिब्बा
कट्टा, गट्टा – सामान व्यापारी माल कर्दली किंवा कदली – दलदलीची जागा, चिखलातील प्रदेश
केरे, कीरे, केडू – पाण्याची सोय असलेले खेडे, जागा, अरसी केरे कल, कल्ल, कालू – दगडांच्या मोठ्या राशि, खाणी, मंतकल्ल, गुंतकल
कोंडा बंडा – पर्वत इंच जडोंगर बडे बडे पत्थर मधील गाव गोवळकोंडा गंज – व्यापारी वस्ती किंवा मोठ्या भागा शेजारील वस्ती
गडडा, गड्डी, गुड्डी – पाण्याजवळची जागा

कुरु गड्डी नदीच्या प्रवाहालगतचा गाव

गोड , गड – गड
दुर्गम, दुर्ग – गड किंवा बांधलेला किल्ला पल्ली, हळ्ळी, पायलम – लहान खेडे
पाक्क, पाक्कम – जरा मोठे गाव पारा – नदीचा समुद्राला मिळताना झालेला दलदलीचा प्रदेश
पेठ, पेटा – व्यापारी उलाढालीचे गाव पुरम – गावातील सधन  भाग
बाग – शहरातील शोभिवंत भाग , रायबाग , तुळशीबाग, राजबाग राय राई – सराय वाटसरूंची, सैन्याच्या हालचालीसाठी वसाहतीची जागा
रेवुलू, रेवालू – बंदर, किनार्यावरील गाव वाटिका, वटी – बाग बगीचा असलेली जागा
वरम – कोणी देणगी किंवा प्रसाद म्हणून तयार केलेली नगरी, मायावरम वाडा – सूंदर आखणी केलेले नगर
विल्ली – मंदिर रहायची जागा असलेला, लोकांच्या रहदरीचा भाग, धर्मशाळा सर – सरोवराजवळ असलेले गाव, अमृतसर
नेर – गावाचे लोकफळ मोठे झाले की, नेर, निरपेक्षा मोठे झाले की, नगरी, आणखी मोठे नगर

अ ९ कर्मफल सिद्धांत (तेलुगू लिपीत लिहिले होते, ” श्रीकृष्ण निर्वाण ख्रिस्तपूर्व ३१०२ या वर्षी १८ फेब्रुवारी रात्री २ वाजून २७ मिनिटे ३० सेकंदांनी झाले. त्या दिवशी प्रमादि नाम संवत्सर, चैत्र शुद्ध प्रतिपदा, शुक्रवार अश्विनी नक्षत्र होते. श्री कृष्णनिर्वाणानंतर कलियुगाचा आरंभ झाला.)

परिशिष्ठ २ – पोथीतील काही महत्वाच्या जीवन घटनांची नोंद आणि त्याचे कुंडलीच्या रुपाने मिळणारे कथन तज्ज्ञ अभ्यासकांनी  एकत्रित  सादर

१७ ऑगस्ट १३२० जन्मदिनांकाची पत्रिका सिंह लग्न तूला राशी चित्रा नक्षत्र…अ ६.४४

श्रींनी घर सोडले  २५ मे १३३६ दिनांकाची पत्रिका… शुक्रवार… अ ४१.२०४

याच दिवसाचे वर्णन पळणी स्वामी ध्यानात अ ४. पान २२ वर

आज यापुढील मराठीतील  पोथी तील कंसातील तारीख २५ मे १३३६ बरोबर ऩसावी असा माझा कयास आहे.

याच पोथीतील हिन्दी अनुवादाचा … अ४.२७ … “ भविष्य में हूण शक प्रचलित होगा। आज हूण शक के अनुसार २५-०५-१३३६, शुक्रवार हैं। आज का दिन हमारे जीवन में बहुत महत्वपुर्ण है।  मैं अपना स्थूल शरीर यहां छोडकर सूक्ष्म शरीर से कुरवपुर उनके सानिध्य में चला जाऊंगा।एक ही समय में सूक्ष्म रुप में चार पांच प्रदेशों में संचार करना मुझे सहजसाध्य है।”  निठुरकरांच्या अनुवादात मराठीत…हेच वर्णन  असे आहे…. अ४ पान २०…. भविष्यकाळात हूण शक (इसवा सन) हे व्यवहारात असेल. आज हूण शकानुसार दिनांक २५-०५-१३३६.शुक्रवार आहे. आजचा दिवस आपल्या जीवनात पार महत्वाचा आहे. मी माझ्या स्थूलशरीराला इथेच ठेऊन सूक्ष्म शरीराने कुरवपुरास जाईन. एका वेळेस चारपाच ठिकाणी सूक्ष्म रूपात विहार करणे मला बाल्यक्रीडा वाटते. आपण सगळेच श्रीपाद वल्लभांच्या ध्यानात असताना, त्यांची आज्ञा झाल्यावर मी (पळनी स्वामी – कंस माझा) )सूक्ष्म शरीराने कुरवपुरात त्यांच्या सांनिध्यात जाईन……

माझे (ओकांचे) कथन – हूण शक म्हणजे इसवी सन हे बरोबर आहे असे वाटत नाही.  आपण सध्याही “शालिवाहन राजाने” या नावाने सुरवात केलेल्या शकाला मानतो. उत्तर भारतात विक्रम( सध्याच्या मध्य प्रदेशातील उज्जैनीच्या विक्रमादित्याच्या पराक्रमी राजवटीची आठवण म्हणून) संवत जास्त मान्यता प्राप्त आहे. भारताबाहेरून आलेल्या हूणांचा शक (कालमापन पद्धती) जिला नेमके काय नाव हूणांनी ठेवले होते ते माहित नाही. इसवी सनाचा हूणांच्या आगमनाशी संबंध वाटत नाही. इसवी सन हे इंग्रज भारतावर राज्य करायला आल्यावर प्रचलित झाले.  हे विधान मान्यता प्राप्त आहे. ग्रेगरीन कॅलेंडर (पोप ग्रेगरी आठवा याने) १५८२ साली मान्य केले. नंतर जुलियन कॅलेंडर २५ मार्च ऐवजी जानेवारी १ पासून नव वर्षाची सुरवात करायची प्रथा १७५२ साली मान्य झाली. त्यावेळी ११ दिवसाचा फरक काल सुधारणा करून मान्यता पावले. म्हणून २५ मे १३३६ ही इसवी तारीख भाषांतरकारांनी घातली असावी. असे मला वाटते. आत जर ती तारीख वगळती तर फक्त वार शुक्रवार होता असा संदर्भ घेतला तर  संदर्भ तिथी तिच परंतु ४ वर्षांचा फरक असे अभिप्रेत धरले तर २७ मे १३४० अधिक महिन्याची जेष्ठ सप्तमी या दिवशी बोलताना शुक्रवार असा बरोबर वार जुळतो…

लीलावैभव चरित्रात कालमापनाचा उल्लेख संवत्सर, मास, तिथी, वार आणि नक्षत्र असा येतो. उदा. श्रींचे काशीत अवतरण, ऋषिकेश, बद्री व केदार उर्वशी ताल, मान सरोवर, कैलाश, करून १३ महिने…

श्रींचे गोकर्णला आगमन  १९ ऑगस्ट १३३७

गोकर्णहून शैल्य गमन  १३ जुलै? १३४०

शैल्यात आगमन आषाढ शु. एकादशी १४ जुलै १३४०

शैल्यात चातुर्मास व ४ दिवस,  संपवून निघाले १२ नोव्हेंबर १३४०

कृष्णा गावापासून जवळच भीमा-कृष्णा निवृत्ती संगमावर १३ नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमा राहून श्रींचे कुरवपुरात आगमन कार्तिक कृ. प्रथमा १३ नोव्हेंबर १३४० (लीला अ ११.९८)

गोविंदभट्ट कुरवपुरात आगमन – मार्गशीर्ष शु. द्वादशी ९ डिसेंबर १३४०

पहिली दत्त जयंती – मार्गशीर्ष पौर्णीमा १२ डिसेबर १३४०

गोविंद भट्ट आणि इतर गोकर्ण, आळंदी व पंढरपूरला परतले… २० डिसेंबर १३४०

शैल्यहून कुरवपुरात गमन

कुरवपुरात गोविंदा अन्य आगमन

पहिला दत्त जयंती महोत्सव – २४ नोव्हेंबर १३४०

शंकर भट्ट आगमन

निजगमन- ६ ऑक्टोबर १३५०

परिशिष्ट ३ – नरसिंह सरस्वतींच्या व  स्वामी समर्थांच्या जीवनकालातील घटनांचा संदर्भ

Sha.१३०० (1378 CE) : Birth लाडाचे कारंजा दि.अभिजित नक्षत्र माध्यान्ह. पौष शुद्ध द्वितीया शनिवार शके १३००.
Sha.1307 (1385 CE) : Upanayan 7 वे वर्ष
Sha.1308 (1386 CE) : Left his home 8वे वर्ष
Sha.1310 (1388 CE) : Took Sanyas काशीमधे 10वे वर्ष
Sha.1338 (1416 CE) : Arrival back home at Lad-Karanja 38 वे वर्ष (22वर्षांनी घरी परतले…)
Sha.1340 (1418 CE) : Gautami-Tatak-Yatra गौतमी तटाक यात्रा (travel along the banks of river Gautami) 40 वे वर्ष
Sha.1342 (1420 CE) : Stay at Parali-Vaijanath परळी-वैजनाथ
Sha.1343 (1421 CE) : Stay at Audumbar औदुंबर (near Bhilavadi)
Sha.1344-1356 (1422 CE-1434 CE) : Stay at Narasoba Wadi alias Narasimhapur 56 वे वर्षापर्यत वाडीत
Sha.1357-1380 (1435 CE-1458 CE) : Stay at Ganagapur गाणगापूर 80 पर्यंत 24 वर्षे गाणगापुरात
Sha.1380 (14 January 1459 CE) : Nijanandagaman निजानंदगमन at ShriShaila श्रीशैल Mountain निजमनंद गमनाला कुठे पात्रात उतरले असावेत…

२. वेंकटपैय्या श्रेष्ठी श्रीपादांच्या काळातील व्यापार करणारे धनिक श्रद्धावान व्यक्ती होते. ते नंतर नृसिंहसरस्वतींच्या अवतारात महाराष्ट्रातील ऐश्वर्यवान धनिक वैश्य कोण असावेत? – स्वामी समर्थ

स्वामी समर्थ महाराज

३. जन्मपत्रिका – स्वामी समर्थ
जन्म: ज्ञात नाही, अक्कलकोट येथे अश्विन व ५ बुधवार १८५७ ला आले
प्रकट दिन: चैत्र शु. २
आई/वडील: ज्ञात नाही
वेष: दिगंबर (अवधूत)
कार्यकाळ: १८५६ ते १८७८
संप्रदाय: दत्तासंप्रदाय, श्री दत्तांचे चतुर्थ अवतार
गुरु: ज्ञात नाही

प्रकट वास्तव्य एकूण ४० वर्षे असून (शके १७६० ते शके १८००) त्यातली २१ वर्षे त्यांनी अक्कलकोट येथे वास्तव्य केले. समाधी: चैत्र व. १३, इ.स १८७८  अक्कलकोट येथे. शके १८०० मध्ये त्यांनी वडाखाली देहत्याग केला.

अभयदान – ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’

“आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण, आमचे नाव नृसिंहभान, काश्यप गोत्र, आमची मीन राशी; पुन्हा विचारल्यास टाळक्यात पायपोस (घालतो)! पण काय रे, तुझी फक्कड मुलगी पुण्यास रात्रंदिवस फिरते तिचा ज्ञानी (गुरू) कोण?” असे फटकळ बोलणे. श्रीमंत, प्रतिष्ठित, नामवर लोकांचा मुलाहिजा न ठेवता पाणउतारा करायची सवय.

पिशाचवृत्ती – महाराज कधी कधी दिवसातून दोन-दोनदा स्नान करीत. केशर-चंदनाची उटी अंगाला लावून घेत. सेवेकरी त्यांना कौपीन नेसवीत. डोक्यावर जरीची कानटोपी घालीत आणि अंगावर शाल पांघरीत; परंतु कोणत्या क्षणी स्वामी महाराज या सर्व वस्तू फेकून देऊन दिगंबर बनतील याचा नेम नसे. कधी कधी आठ-आठ दिवस स्नानच करीत नसत. आरती करून घेत. दुसऱ्याच्या हाताने सर्व कारभार होत असे. कोणास नकळत एखाद्या बागेत, स्मशानात अगर जंगलात जाऊन राहत.

उत्तर  भारतीय हिन्दीभाषेच्या बाजात बोलत.  ‘स्वामी बैठे… पर,   “वामन्या भ*****, घरात एवढं धान्य भरून ठेवलस पण आम्हाला कधी जेवायला बोलवलं नाहीस.”अशा ग्राम्य बोलीत ते समोरच्याला खडकावत.

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या हातातील गोटी (इंद्रनील मणी) व चरण पादुका (बेळगाव येथील) उपलब्ध आहेत.

चरित्रग्रंथ: श्री स्वामी लीलामृत,  श्री गुरुलीलामृत

शिष्य: बाळप्पा महाराज, चोळप्पा महाराज, आळंदीचे नृसिंहसरस्वती, रामानंद बिडकर महाराज

खालील संतांवर विशेष प्रभाव: श्री साईबाबा, श्री गजानन महाराज शेगाव, सद्गुरू हरिबाबा  महाराज फलटण, शंकर महाराज
अ 9. 57Aryabhatt.   3.1416. He finished his book “Aryabhattiya” in 499 AD in which he gives the exact year of the beginning ofThe greatest astronomer and mathematician, Aryabhatt, was born in 476 AD. His work in astronomy is an asset to the scholars. He gave an accurate figure for pi ( kaliyug. He writes,
“When the three yugas (satyug, tretayug and dwaparyug) have elapsed and 60 x 60 (3,600) years of kaliyug have already passed, I am now 23 years old.” It means that in the 3,601st year of Kali era he was 23 years old. Aryabhatt was born in 476 AD. Thus, the beginning of kaliyug comes to 3,601 – (476 + 23) = 3102 BC.

संदर्भ—-
अ ३३ ते ४५ पान नकाशा… धर्मगुप्त व शंकर भट्टचा पीठापुरचा प्रवास,
पद्मशालीकुलतील गुरुचरण भक्त अ२.१५३
आनंद शर्मा अ 13
अ १३.९६ गायत्री मंत्र सर्वाक्षर महिमा वर्णन
अ १३.९८ दो चपाती देव लक्ष्मी या वाक्याचे वर्णन
अ १३.९९ नवम संख्या विवरण
अ १३.१०२ चरितामृत पारायण फळ

(समाप्त)