आक्रमणात घायाळ हिंदु तरुणाचा उपचारांच्या वेळी मृत्यू

  • श्रीनगर येथील कृष्णा ढाब्यावरील आतंकवादी आक्रमणाचे प्रकरण

  • सामाजिक माध्यमांतून ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांवर टीका

काश्मीरमध्ये अद्यापही हिंदू असुरक्षित आहेत. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

नवी देहली – श्रीनगरमधील प्रसिद्ध कृष्णा ढाब्यावर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ढाब्याच्या मालकाचा मुलगा आकाश मेहरा गंभीररित्या घायाळ झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू असतांना त्याचा मृत्यू झाला. यानंतर सामाजिक माध्यमांतून हिंदुत्वनिष्ठांनी टीका करण्यास चालू केली आहे. यासाठी ‘कृष्णा ढाबा’ नावाने हॅशटॅगही ट्रेंड करण्यात आला.

लोकप्रिय कृष्णा धाब्याच्या मालकाचा मुलगा आकाश मेहरा यांच्यावर दहशतवाद्यांचा हल्ला (स्त्रोत: पीटीआय)

१. ट्विटरवर एकाने लिहिले की, ‘भारतात हिंदु असणे अपराध आहे का ?’ ‘आता तथाकथित निधर्मीवादी नेते आणि पुरस्कार परत करणारी टोळी कुठे गेली ?’ ‘हिंदूंची हत्या झाल्यावर धर्मनिरपेक्षतेची हत्या होत नाही का ?’ असे प्रश्‍न विचारले. अन्य एकाने लिहिले की, इस्लामी आतंकवादाने एका पराक्रमी हिंदूचा बळी घेतला.

२. या आतंकवादी आक्रमणाचे दायित्व ‘मुस्लिम जांबाज फोर्स’ या आतंकवादी संघटनेने घेतले आहे. या आक्रमणाच्या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या आरोपींचे संबंध लष्कर-ए-तोयबाच्या गटाशी आहेत.