१. मनोविकार तज्ञांनो सावधान !
संसर्गजन्य रोग होऊ नये; म्हणून आधुनिक वैद्य (डॉक्टर) हातमोजे आणि तोंडाला कापड (रुमाल) लावणे, अशी काळजी घेतात. त्याचप्रमाणे मनोविकार असलेल्यांवर उपाय करतांना मनोविकारतज्ञांनीही योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३१.१०.२०१९)
२. संसर्गजन्य रोग आणि मनोविकार यांतील भेद
टीप १ : एखादा दु:खद किंवा धक्कादायक प्रसंग जीवनात घडल्यामुळे मानसिक धक्का बसून मनावर विपरित परिणाम होऊन मानसिक त्रास होऊ शकतो.
टीप २ : आध्यात्मिक कारणांमुळे शारीरिक किंवा मानसिक स्तरावरील रोग झाल्यास अन्य उपचार घेण्यासह आध्यात्मिक उपाय केल्यानेही त्रास न्यून होऊ शकतो.
३. मनोविकार असलेल्यांवर उपाय करतांना मनोविकारतज्ञांनीही योग्य काळजी घेणे आवश्यक असणे !
वाईट शक्तींमुळे मनोविकार होण्याचे प्रमाण ७० टक्के आहे. त्यामुळे जेव्हा वाईट शक्तीने बाधित झालेल्या मनोरुग्णावर मनोविकारतज्ञ उपचार करत असतात, तेव्हा रुग्णातील वाईट शक्तीला राग येऊन ती मनोविकारतज्ञावर काळी शक्ती सोडून त्याचे मन आणि बुद्धी यांवर आवरण निर्माण करू शकते. त्यामुळे वाईट शक्तीने बाधित असणार्या मनोरुग्णांवर उपचार करतांना मनोविकारतज्ञांना विविध प्रकारचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक किंवा आध्यात्मिक स्वरूपाचे त्रास होऊ शकतात. यासाठी मनोविकारतज्ञ कोणत्याही मनोरुग्णांवर उपचार करतांना स्वत:ला वाईट शक्तींचे त्रास होऊ नये, यासाठी एखाद्या उच्च देवतेचा नामजप करणे, संतांच्या आवाजातील भजने ऐकणे, रुग्णांना तपासण्यापूर्वी स्वत:भोवती संरक्षककवच निर्माण होण्यासाठी देवतेला प्रार्थना करणे, कपाळाला विभूती लावणे आदी आध्यात्मिक उपाय करू शकतात.
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.२.२०२० रात्री ११)
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |