‘मानवाच्या स्तरा’नुसार साधना शिकवणारा ‘गुरुकृपायोग’ !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘मानवाचा स्तर’ हे सर्वसाधारण मनुष्याची स्थिती दर्शवणारे परिमाण आहे. हा स्तर विविध आध्यात्मिक आणि मानसिक घटकांच्या आधारे अभ्यासता येतो.

१. आध्यात्मिक : अहंचे प्रमाण, ईश्वराप्रतीचा भाव, आध्यात्मिक पातळी आणि वाईट शक्तींच्या त्रासाची तीव्रता

२. मानसिक  : स्वभावातील गुण आणि दोष

पूर्वीच्या काळात मानवाचा स्तर चांगला असल्यामुळे त्या काळात ज्ञानयोग, हठयोग, भक्तीयोग यांसारख्या साधनामार्गांनुसार साधना करणे सहज शक्य होते. आता कलियुगामध्ये मानवाचा स्तर खूपच खालावत चालला आहे. त्यामुळे सध्याच्या काळात या साधनामार्गांनुसार साधना केल्यास प्रगती होण्यास अधिक कालावधी लागू शकतो. ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गामध्ये कलियुगातील ‘मानवाच्या स्तरा’शी संबंधित सर्व घटकांसाठी नेमकेपणाने उपाययोजना दिलेली आहे. त्यामुळे सध्याच्या काळात ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना केल्याने साधकांची आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होत आहे.

– सच्चिदनंद परब्रह्म डॉ. आठवले

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.