रशियाचे राष्ट्रपती यांनी उणे १७ डिग्री तापमान असलेल्या पाण्यात केले धार्मिक स्नान !

या स्नानामुळे पाप धुतले जातात, अशी मान्यता !

रशियामध्ये पुरो(अधो)गामी, तसेच अंनिससारखी संघटना आणि स्वतःला अधिक बुद्धीप्रामाण्यवादी समजणारे नाहीत, हे पुतिन यांचे भाग्यच म्हणावे लागेल ! अन्यथा त्यांना या स्नानावरून ‘सनातनी’ ठरवण्यात आले असते !

ख्रिस्ती धर्मानुसार कर्मकांड म्हणून स्नान करतांना रशियाचे राष्ट्रपती पुतिन

मॉस्को (रशिया) – रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी उणे १७ डिग्री सेल्सियस तापमान असलेल्या बर्फाच्या थंड पाण्यात स्नान केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. पुतिन यांनी ख्रिस्ती धर्मानुसार कर्मकांड म्हणून हे स्नान केले. ‘इपिफनी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या दिवशी त्यांनी हे स्नान केले. प्रतीवर्षी या दिवशी लोक असे कर्मकांड करतात. यात लाखो लोक सहभागी होत असतात. असे करून लोक येशू ख्रिस्ताची आठवण काढतात. याच दिवशी येशू ख्रिस्ताने जॉर्डन नदीमध्ये स्नान केले होते. ‘या दिवशी नदीतील पाणी पवित्र होते. यामुळे लोकांचे सर्व पाप धुतले जातात’, अशी मान्यता आहे.