१५ डिसेंबर २०२० या दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांची पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने…
वर्ष १९२७ मध्ये ब्रिटीश सरकारने २२ टक्के सारा (कर) वाढ केली. असंतोषाचा भडका उडाला. वल्लभभाई पटेल यांनी या वेळी आंदोलन केले. हेच ते गाजलेले बार्डोली आंदोलन ! हा संघर्ष १२ ते १५ वर्षे चालू होता. सुमारे दीड-दोन लाख नागरिकांचे नेतृत्व पटेल यांनी केले. सरकारने जप्त केलेल्या भूमी परत मिळवल्या. वर्ष १९३८ उजाडावे लागले; पण बार्डोलीकर वाकलेही नाहीत आणि मोडलेही नाहीत. ते चिवटपणे झुंजत राहिले. याच संघर्षानंतर वल्लभभाईंना ‘सरदार’ ही लोकपदवी प्राप्त झाली. ‘भारताचे लेनिन’ किंवा ‘भारताचे बिस्मार्क’ या शब्दांत इंग्रजी पत्रकारितेने पटेल यांची प्रशंसा केली.’
(संदर्भ : ‘लोकराज्य’, नोव्हेंबर २०१४)