…द्विराष्ट्र सिद्धांताच्या वस्तूस्थितीमध्ये आज तरी काही भेद झाल्याचे दिसते का ?

मध्ययुगीन कालखंडात इस्लामी आक्रमणाच्या विरुद्ध स्वधर्म रक्षणाचाच संघर्ष होता. इस्लामी राजवटींमुळे तत्कालीन बृहत् भारताच्या मोठ्या प्रदेशातील लोकसंख्येचे बळाच्या आधारे धर्मांतर केले गेले, ज्याचा परिणाम पाकिस्तान, बांगलादेश आणि आजच्या भारतातील मुसलमान लोकसंख्या आहे अन् या इस्लामी आक्रमणाला इथल्या हिंदूंनी जो कडवा संघर्ष केला, त्याचा परिणाम म्हणजे आजचा भारत हिंदुबहुल म्हणून शिल्लक आहे.

१. जोपर्यंत मोगल शासकांना मुसलमान स्वतःचा आदर्श मानतील, तोपर्यंत हिंदू-मुसलमान ऐक्य कदापि शक्य नाही !

ज्यांनी प्राणपणाने लढा दिला त्यांचे वंशज आज हिंदु आहेत आणि ज्यांनी शरणागती पत्करून इस्लाम स्वीकारला त्यांचे वंशज आज मुसलमान आहेत; परंतु ज्यांच्या पूर्वजांना आक्रमणकर्त्यांनी बळजोरीने मुसलमान केले, त्यांचेच वंशज त्या आक्रमणकर्त्यांना स्वतःचा आदर्श मानतात.

श्री. भारत आमदापुरे

‘जोपर्यंत कासीम, गझनी, घोरी, तैमूर, खिलजी, बाबर या इस्लामी आक्रमणकर्त्यांना आणि जहांगीर, अकबर, शहाजहां, औरंगजेब या अत्याचारी मोगल शासकांना मुसलमान स्वतःचा आदर्श मानतील, तोपर्यंत हिंदू-मुसलमान ऐक्य कदापि शक्य नाही.’

२. …हिंदू आणि मुसलमान मिळून एक राष्ट्र बनवण्याचा दृष्टीकोन वायफळ आहे ! – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे, ‘हिंदू आणि मुसलमान यांना असा काही समान पूर्वेतिहास आहे का, ज्या अभिमानाच्या किंवा दु:खाच्या गोष्टी म्हणून एकत्रितपणे सांगता येतील ? हाच अत्यंत बिकट प्रश्न आहे. जर हिंदू आणि मुसलमान मिळून एक राष्ट्र निर्माण करायचे असेल, तर या प्रश्नाचे उत्तर दिलेच पाहिजे. त्यांच्यातील या संबंधाविषयी सांगायचे झाले, तर हे दोन समाज, म्हणजे परस्पराविरुद्ध लढणार्‍या दोन सशस्त्र छावण्या आहेत. समान ध्येयासाठी परस्पर सहभागाने त्यांनी केलेली एकही घटना सापडणार नाही. त्यांचा भूतकाळ हा परस्पर नाशाचा, परस्पर वैर्‍याचा आहे. जसा तो राजकीय क्षेत्रात आहे, तसाच तो धार्मिक क्षेत्रात आहे. भाई परमानंद यांनी नमूद केल्याप्रमाणे इतिहासात हिंदू पृथ्वीराज, राणा प्रताप, शिवाजी आणि बेरागी बीर यांच्या स्मृतीचा आदर करतात, ज्यांनी या भूमीच्या सन्मानासाठी आणि स्वातंत्र्यासाठी मुसलमानांविरुद्ध लढा दिला, तर मुसलमान हे महंमद बिन कासीमसारख्या भारतावरील आक्रमणकर्त्यांकडे आणि औरंगजेबसारख्या राज्यकर्त्यांकडे स्वतःचे आदर्श म्हणून पहातात.

धार्मिक क्षेत्रात हिंदू रामायण, महाभारत आणि गीता यांच्यापासून प्रेरणा घेतात, तर मुसलमान हे कुराण अन् हदीस यांतून प्रेरणा घेतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये जोडणार्‍या गोष्टींपेक्षा तोडणार्‍या गोष्टी या फार मोठ्या आहेत. हिंदू आणि मुसलमान यांच्या सामाजिक जीवनातील समान भाषा, समान वंश, समान देश यांसारख्या काही समान वैशिष्ट्यांवर विसंबून राहून अखंड भारतवादी लोक हे काही केवळ अपघाताने आणि वरवरच्या असलेल्या गोष्टींना चुकीचे महत्त्व देत आहेत अन् अत्यंत महत्त्वाच्या, तसेच मूलभूत असणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहेत. हिंदू आणि मुसलमान यांना एकत्रित जोडणार्‍या तथाकथित समान वैशिष्ट्यांपेक्षा त्यांच्यातील राजकीय अन् धार्मिक शत्रूत्व हे त्यांच्यामध्ये खोल दरी निर्माण करते. दोन्ही समुदायांचा भूतकाळ दोघांनाही विसरता आला, तर शक्यता वेगळी असू शकते; परंतु दोन्ही समाज त्यांचा भूतकाळ कधीच विसरू शकत नाहीत किंवा पुसून टाकू शकत नाहीत. त्यांचा भूतकाळ त्यांच्या धर्मात गुंतलेला आहे आणि प्रत्येकाने आपला भूतकाळ सोडणे, म्हणजे त्यांनी त्यांचे धर्मच सोडून देणे आहे. तशी अपेक्षा करणे हे व्यर्थ आहे…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

कोणताही समान पूर्वेतिहास नसतांना हिंदू आणि मुसलमान मिळून एक राष्ट्र बनवण्याचा दृष्टीकोन वायफळ ठरतो. तसा दृष्टीकोन बाळगणे, म्हणजे कायम भ्रम बाळगण्यासारखे होय.’ (संदर्भ : Dr. Babasaheb Ambedkar – writings and speeches – volume 8 – page no. 35, 36, 37)

३. ..यामुळे द्विराष्ट्राच्या वस्तूस्थितीत काही भेद झाल्याचे दिसत नाही !

पाकिस्तानच्या विविध क्षेपणास्त्रांची नावे ‘गूगल’ संकेतस्थळावर शोधून पहा. त्यांनी या इस्लामी आक्रमणकर्त्यांना ‘स्वतःचा बाप मानून’ त्यांची नावे त्यांच्या क्षेपणास्त्रांना दिलेली आहेत.

सहस्रो वर्षांचा संघर्षाचा इतिहास आणि त्यातून पुढे आलेले आदर्श, हा द्विराष्ट्र सिद्धांतातील एक प्रमुख घटक आहे. आज भारतातील मुसलमानही इस्लामी आक्रमणकर्ते  आणि अत्याचारी मोगल शासक यांना स्वतःचा आदर्श मानतात. त्यामुळे याविषयात भारतातील आणि पाकिस्तानातील मुसलमान यांच्यात कोणताही भेद नाही. त्यामुळे द्विराष्ट्राच्या वस्तूस्थितीमध्ये आज स्वतंत्र खंडित भारतातही काही भेद झाल्याचे दिसत नाही.

– श्री. भरत आमदापुरे, अभियंता, पुणे. (१२.३.२०२५)