मध्यप्रदेशात हिंदु नाव सांगून धर्मांधांने हिंदु तरुणीशी विवाह केल्यानंतर धर्मांतरासाठी तिच्यावर दबाव

प्रतिकात्मक चित्र

भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्याकडे पीडित महिलेने तिला सलमान नावाच्या तरुणाने उमेश असे हिंदु नाव सांगत प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाह केला आणि नंतर धर्मांतरासाठी त्रास देत असल्याची तक्रार केली. त्यानंतर मिश्रा यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. लवकरच मध्यप्रदेश सरकार लव्ह जिहाद विरोधी कायदा करणार आहे.

पीडित महिलेने मंदिरामध्ये विवाह केला होता. तिला एक मुलगाही आहे. या महिलेने आरोप केला की, सलमान यांच्या कुटुंबियांच्या विरोधात तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात पोलीस ठाण्यात तक्रार केली होती; मात्र त्या वेळी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.