हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते धोंडीराम भोपळे-गुडाळकर आणि मित्रमंडळ यांच्याकडून ऊस तोडणी कामगारांना दीपावली फराळ वाटप

गरजूंना दीपावली फराळ वाटप करतांना धोंडीराम भोपळे-गुडाळकर (उजवीकडे)

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – हिंदुत्वनिष्ठ श्री.धोंडीराम भोपळे-गुडाळकर आणि मित्रमंडळ यांच्याकडून बसस्थानक परिसर, तसेच पंचगंगा साखर कारखान्यावरील ऊसतोडणी कामगारांना फराळ वाटप करण्यात आले. श्री. उत्तम कुंभार यांनी आवाहन केल्यानंतर बालाजी वाहनतळावर अनेक लोकांनी उत्स्फूर्तपणे दीपावलीचा फराळ आणून दिला. यांनतर याची २५० पाकीटे बनवून तो ऊसतोडणी कामगार आणि गरजू यांना वाटप करण्यात आले. या कार्यात सर्वश्री उत्तम कुंभार, रवी कुंभार, रमेश खांडेकर, संजय कुंभार, लाडणे मामा, शिंदेकाका, सुभाष कांबळे, तसेच इतर अनेक यांचे सहकार्य लाभले.

या संदर्भात श्री. धोंडीराम भोपळे-गुडाळकर म्हणाले, ऊस तोडणी कामगार अनेक किलोमीटर त्यांचे घर सोडून तोडणीसाठी आपल्या भागात येतात. त्यामुळे या लोकांच्या कुटुंबियांनाही फराळ मिळावा या उद्देशाने आम्ही हा उपक्रम राबवला. या उपक्रमासाठी ज्या ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केले त्यांचे आभार.