पाकच्या मिठी शहरामध्ये हिंदू बहुसंख्य !

मुसलमान आणि हिंदू एकोप्याने रहातात !

जेथे हिंदू मोठ्या संख्येने असतात आणि ‘शांतीपूर्ण’ समाज १-२ टक्केच असतो, तेथे तो शांततेने रहातो; मात्र जेथे तो १५ ते २० टक्के होतो, तेथे तो बहुसंख्यांकांना त्रास देऊ लागतो ! संपूर्ण पाकमध्ये हाच समाज बहुसंख्य असल्याने एकूण पाकमध्ये हिंदूंचा वंशसंहारच होत आहे, हे हिंदूंनी नेहमीच लक्षात ठेवावे !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या सिंधमधील थारपारकर जिल्ह्यातील मिठी शहरामध्ये ८० टक्के नागरिक हे हिंदू आहेत. येथील एकूण लोकसंख्या ८७ सहस्र आहे. या शहरामध्ये हिंदु आणि मुसलमान यांच्यातील सणांच्या वेळी दोघेही मिळूनमिसळून ते साजरा करतात.

मिठी गावातील श्रीकृष्ण मंदिर

हे शहर पाकच्या लाहोर शहरापासून ८७५ किलोमीटर, तर गुजरातच्या कर्णावतीपासून केवळ ३४० किलोमीटर अंतरावर आहे. या गावामध्ये गोहत्या केली जात नाही.

रमझानच्या काळात येथे काही हिंदू रोजेही ठेवतात. येथे गुन्हेगारी केवळ २ टक्के आहे. या शहरामध्ये अनेक मंदिरे आहेत. त्यातही येथील श्रीकृष्ण मंदिर हे प्रसिद्ध आहे. नमाजाच्या वेळी मंदिरांतील घंटा वाजवण्यात येत नाही, तर पूजेच्या वेळी ध्वनीक्षेपकावरून अजान ऐकवली जात नाही.