चातुर्मासात एकादशीच्या निमित्ताने काही शब्दांचे अर्थ

॥ श्री विष्णवे नमः ॥

चातुर्मासाच्या अंतर्गत आज, २७ सप्टेंबर या दिवशी असलेल्या कमला एकदशीनिमित्त ‘पुराण’ या शब्दाचा अर्थ पाहूया.

पुण्यपापादिकथनाद्राक्षसादिनिवारणात् ।
नवभक्त्यादिजननात् पुराण इति कथ्यते ॥

अर्थ : भगवान श्री शिवशंकर माता पार्वतीला म्हणतात, ‘‘हे देवी, पुण्य शब्दातील ‘पु’, राक्षस या शब्दातील आद्याक्षर ‘रा’ आणि नवभक्ती शब्दातील ‘न’ या तीनही शब्दांच्या संयोगातून ‘पुराण’ हा शब्द सिद्ध होतो.

पुराणाची खालील ३ वैशिष्ट्ये आहेत.

१. पुण्य आणि पाप या दोघांनाही पुराणच परिभाषित करते.

२. राक्षसांच्या राक्षस या भावाला निवारण करते.

३. नवधा भक्तीमार्गाचे जनक आहे.

यावरून पुराण या शब्दाची सार्थकता लक्षात येते.

– वेदमूर्ती कौशल दामले, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.