पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांना ‘सद्गुरु’ म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले यांनी त्यांचे केलेले सूक्ष्म परीक्षण !  

सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता आणि अखंड ईश्वरी अनुसंधानात असलेले पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ हे ‘सद्गुरु’पदी विराजमान झाल्याचे आश्रमातील फलकाद्वारे घोषित करण्यात आले. त्यांचे एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.

सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

१. ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीच्या चित्रातील स्पंदनांचे प्रमाण

१ अ. गुरुतत्त्व

१ अ १. गुरुतत्त्वाचे वलय सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्या आज्ञाचक्रस्थानी कार्यरत होणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने ते साधना करत असल्याने असे आहे.

१ आ. अव्यक्त भाव

१ आ १. अव्यक्त भावाचे वलय सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्या आज्ञाचक्रस्थानी कार्यरत होणे

१ आ २. अव्यक्त भावाचा प्रवाह ईश्वराकडून सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्याकडे आणि सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्याकडून ईश्वराकडे प्रवाहित होणे : ते ईश्वराच्या अखंड अनुसंधानात असल्याने असे आहे.

सौ. योया वाले

१ इ. शरणागतभाव

१ इ १. शरणागतभावाचे वलय सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्या अनाहत चक्रस्थानी कार्यरत होणे : त्यांचा अहं अल्प असून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हेच सर्वकाही करवून घेत आहेत’, असा त्यांचा भाव असल्याने असे झाले.

१ ई. प्रेमभाव

१ ई १. प्रेमभावाचे वलय सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्या अनाहत चक्रस्थानी कार्यरत होणे : याचे कारण त्यांचा स्वभाव मुळातच प्रेमळ असून त्यांनी साधनेतील प्रयत्नांनी समष्टी प्रेमभाव वाढवला आहे.

१ ई २. प्रेमभावाचे कण सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्याकडून वातावरणात आणि साधकांकडे प्रक्षेपित होणे

१ उ. तारक शक्ती (या माध्यमातून मिळणारे ईश्वरी ज्ञान)

१ उ १. तारक शक्तीचे कण सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्या आज्ञाचक्रस्थानी आकृष्ट होणे

१ उ २. तारक शक्तीचे वलय सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्या आज्ञाचक्रस्थानी कार्यरत होणे : त्यांच्यात सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असल्याने असे आहे.

१ ऊ. चैतन्य

१ ऊ १. चैतन्याचे वलय सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्यात कार्यरत होणे : त्यांना आध्यात्मिक त्रास नसून त्यांच्यात नेहमीच चैतन्य असल्याने असे आहे.

१ ऊ २. चैतन्याचे वलय सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्याकडून व्यापक आणि प्रकाशमान स्वरूपात वातावरणात प्रक्षेपित होणे

१ ए. आनंद

१ ए १. आनंदाचे वलय सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्या मुखाभोवती कार्यरत असणे : याचे कारण ते नेहमीच विनम्र असून त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची काहीच जाणीव नसते.

१ ए २. आनंदाचे वलय सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्याभोवती कार्यरत असणे : त्यांचा उच्च आध्यात्मिक स्तर असल्याने असे आहे.

१ ए ३. आनंदाचे कण सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्याकडून वातावरणात प्रक्षेपित होणे

२. सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांची अन्य गुणवैशिष्ट्ये

अ. गतजन्मी सद्गुरु गाडगीळ काकांनी ईश्वरी ज्ञानाशी संबंधित साधना केली असल्याने सद्गुरु काकांमध्ये आधीपासूनच सूक्ष्मातील जाणण्याची, तसेच ईश्वरी ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता आहे. आताही त्यांच्यात सूक्ष्मातील जाणण्याची तीव्र तळमळ असल्याने सूक्ष्म-जगताविषयी त्यांना ज्ञान मिळते.

आ. गतजन्मी त्यांनी आज्ञापालन करून त्यांच्या गुरूंनी सांगितलेली साधना भक्तीभावाने केली आहे. गतजन्मी त्यांची साधना व्यष्टी स्वरूपाची असल्याने (समष्टी साधना करून मोक्षप्राप्ती करण्यासाठी) त्यांना पुनर्जन्म मिळाला आहे.

इ. गुरुसेवा भावपूर्ण केल्यामुळे जन्मतःच त्यांचा अहं अल्प आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने त्यांनी समष्टी साधना केल्याने त्यांची अध्यात्मात जलद प्रगती झाली. याच जन्मी त्यांना मोक्षप्राप्ती होईल.

ई. सद्गुरु गाडगीळकाका ईश्वराच्या अखंड अनुसंधानात असतात. झोपलेले असतांनाही ते ध्यानावस्थेत असतात आणि त्यांचे ईश्वराशी अनुसंधान टिकून असते. ते झोपलेले असतांना त्यांचे डोळे ध्यान लावल्याप्रमाणे वरच्या दिशेला जातात.

उ. सद्गुरु गाडगीळकाका साधकांशी बोलत असतांनाही त्यांचे ईश्वराशी अनुसंधान चालू असते. त्या वेळी त्यांचे आज्ञाचक्र जागृत होते.

ऊ. सद्गुरु गाडगीळकाका मनाने निर्मळ आणि निरागस आहेत. ते अत्यंत सात्त्विक दिसतात. त्यांचा तोंडवळा आनंदी असतो. त्यांचा अहं अल्प असल्याने साधकांना नेहमी त्यांच्याशी बोलावेसे वाटते आणि त्यांच्याशी बोलून साधकांना आनंद मिळतो. त्यांच्यासमवेत असतांना साधकांची भावजागृती होत असून साधकांना ‘आपल्यावर आध्यात्मिक उपाय होत आहेत’, असे जाणवते.

३. सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये

४. अनुभूती

अ. सद्गुरु गाडगीळकाका चालतात, तेव्हा त्यांच्याकडून पुष्कळ सुगंध प्रक्षेपित होत असल्याचे मला जाणवते. त्यांच्यातील शक्ती (सकारात्मक स्पंदने) सर्वत्र पसरत असल्याचे जाणवून मला आनंद होतो आणि माझा उत्साह वाढतो.

आ. एकदा मला आध्यात्मिक त्रास होत असतांना सद्गुरु गाडगीळकाका माझ्यासाठी नामजप करत होते. त्या वेळी ‘नामजपाच्या माध्यमातून माझ्याकडे चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवत होते. त्यांच्यातील प्रेमभाव आणि तळमळ यांमुळे माझा आध्यात्मिक त्रास अल्प वेळेत न्यून झाला.

इ. त्यांच्या खोलीत प्रवेश करतांना मला पुष्कळ चैतन्य जाणवते. त्या वेळी ‘मी एखाद्या मंदिरातच प्रवेश करत आहे’, असे मला वाटते. खोलीत असतांना ‘मी जनलोकात आहे’, असे वाटून माझे मन निर्विचार होते. माझ्यावर आध्यात्मिक उपाय होतात आणि ‘तेथेच अधिक काळ थांबावे’, मला असे वाटते.’

– एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले (२.६.२०२०)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात.

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक