(म्हणे) ‘आमच्या अणूबॉम्बची पोहोच आसामपर्यंत आहे !’

पाककडून भारताला पुन्हा एकदा अण्वस्त्र आक्रमणाची धमकी

पाकची शस्त्रे मुसलमानांना हानी पोहोचवणार नसल्याचेही विधान

युद्धाची खुमखुमी असलेल्या पाकला आता सरकारने धडा शिकवावा !

इस्लामाबाद – आमच्याकडे असलेल्या अणूबॉम्बची पोहोच आसामपर्यंत आहे, तसेच या आक्रमणात मुसलमानांची कोणतीही हानी होणार नाही, अशी धमकी पाकचे वादग्रस्त रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी भारताला दिली. पाकिस्तानातील पत्रकार नायला इनायत यांनी या विषयीचा एक व्हिडिओ त्यांच्या टि्वटरवरून प्रसारित केला आहे.

या वेळी रशीद पुढे म्हणाले की, ‘जर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले, तर ते शेवटचे युद्ध असेल. जर भारताने पाकिस्तानवर आक्रमण केले, तर पारंपरिक युद्ध होणार नाही. आमच्याकडे असे अणूबॉम्ब आहेत जे अचूक लक्ष्य साधू शकतात. हे अणूबॉम्ब ठराविक प्रदेशाला लक्ष्यही करू शकतात, हे भारताने लक्षात ठेवावे. आमच्याकडील शस्त्रे ही मुसलमानांचा जीव वाचवून थेट आसामपर्यंत आक्रमण करू शकतात.’ शेख रशीद यांनी यापूर्वीही भारताला युद्धाची धमकी दिली आहे.