‘वर्ष १९५१ मध्ये देशाची लोकसंख्या ३५ कोटी होती. वर्ष २०११ मध्ये ती १२१ कोटींहून अधिक झाली, तर २०२५ पर्यंत ती १५० कोटींपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. देशातील जन्मदर वाढला; पण साधनांमध्ये तुलनेने काही वाढ झालेली नाही; म्हणूनच सरकारने २ अपत्ये असलेल्यांनाच सुविधा देणारा लोकसंख्या नियंत्रण कायदा आणावा. तसेच दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या लोकप्रतिनिधींना किंवा नागरिकांना निवडणूक लढवण्यासही बंदी असावी, अशी मागणी भाजपचे खासदार हरनाथसिंह यादव यांनी राज्यसभेत केली.’