…तर वारकर्यांच्या प्रक्षोभाला सामोरे जाण्याविना शासनाकडे कोणताही पर्याय नसेल ! – संतवीर बंडातात्या कराडकर
राजकीय मेळावे चालू असतांना प्रदीर्घ परंपरा असलेल्या पायी वारीला अनुमती नाकारली जाण्यावर वारकर्यांचा आक्षेप !
राजकीय मेळावे चालू असतांना प्रदीर्घ परंपरा असलेल्या पायी वारीला अनुमती नाकारली जाण्यावर वारकर्यांचा आक्षेप !
संतांच्या परंपरा जपल्याने सगळी विघ्ने नाहीशी होतात. त्यामुळे पायी वारीला अनुमती देण्यात यावी.
आषाढी वारी पायी करण्यासाठी सरकारने अधिकृतरित्या अनुमती द्यावी, यासाठी ३० जून या दिवशी अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने भजन आंदोलन करण्यात आले. कोरोनाविषयीच्या नियमांचे पालन करत हे आंदोलन करण्यात आले.
आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १ जुलैला देहूतून प्रस्थान करणार आहे. पालखी सोहळ्याच्या पूर्वी संत तुकाराम महाराज देऊळवाड्यात पालखी प्रस्थान सप्ताह चालू आहे. या वर्षी आषाढी वारी सरकारच्या वतीने विशेष वाहनाने पंढरपूर येथे जाणार आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रेनिमित्त १७ ते २५ जुलै या ७ दिवसांच्या कालावधीत पंढरपूर शहरासह परिसरातील १० गावांमध्ये संचारबंदीचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे पाठवण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.
वारकरी भवनचे उद्घाटन भाजप आमदार सुरेश खाडे आणि ह.भ.प. हरिदास बोराटे महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
वारकरी भाविकांनी वर्षातील सर्व वारी, रामनवमी, तुकारामबीज, हनुमान जयंती, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे सर्व उत्सव शासनाच्या सूचना स्वीकारून साजरे केले. कोरोना संसर्गामुळे कोणीही शासनाच्या विरोधात भूमिका न घेता आतापर्यंत सहकार्यच केले आहे.
सरकारने पायी वारी रहित करून वारकरी संप्रदायाच्या भावनांचा अनादर केला आहे. याचा फेरविचार करून २४ जूनच्या आत ५० वारकर्यांसमवेत पायी वारीची अनुमती द्यावी,..
पालट करून पायी वारी होण्यासाठी सरकारने अनुमती द्यावी, अन्यथा अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून येत्या १६ जून या दिवशी सोलापूर येथे भजन आंदोलन करणार आहोत….
राज्या सरकारने पुन्हा एकदा पायी वारीवर बंधने घालून वारकरी संप्रदायाच्या भावनांचा अनादर केला आहे. पंढरपूरमध्ये राजकीय मेळावे चालतात, तर मग पायी वारी का नको ? असा प्रश्न वारकरी संप्रदाय युवा मंच महाराष्ट्रचे अध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांनी केला आहे.