पुणे महापालिकेचे कृत्रिम हौद आणि मूर्ती संकलन केंद्र यांचे धर्मद्रोही पर्याय नाकारून भाविकांचा वहात्या पाण्यात विसर्जन करण्याकडे कल !

महापालिकेचे कृत्रिम हौद, तसेच मूर्ती संकलन केंद्रांचे धर्मद्रोही पर्याय नाकारून भाविकांचा वहात्या पाण्यात विसर्जन करण्याकडे कल दिसून आला.

नागपूर येथे ७ सहस्र १७७ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !

श्री गणेशमूर्ती शाडूच्‍या मातीची करून शास्‍त्रसुसंगत गणेशोत्‍सव साजरा करणार्‍या नागपूरकरांचे अभिनंदन !

पुण्यातील ५ मानाच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन ! ९ घंट्यांहून अधिक काळ चालली मिरवणूक !

पुण्यातील पाचवा केसरीवाडा येथील गणपतीच्या मिरवणुकीला ८ घंटे लागले. पाचवा केसरीवाडा गणेशमूर्तीचे सायंकाळी ६ वाजून ५९ मिनिटांनी विसर्जन करण्यात आले.

पुण्‍यातील ‘ग्राहक पेठ’ने गणेशोत्‍सवात साकारला ‘मार्सेलिसची उडी’ हा देखावा !

येथील सुप्रसिद्ध ‘ग्राहक पेठ’ यांच्‍या वतीने प्रतिवर्षी गणेशोत्‍सवानिमित्त देखावा आयोजित करण्‍यात येतो. मागील वर्षी त्‍यांच्‍याकडून बिस्‍किटांपासून बनवलेल्‍या हत्तीवर मूर्ती ठेवण्‍यात आली होती.

हडपसर (पुणे) येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत मारहाण !

हडपसर येथील मांजरी भागात श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत ‘स्‍पीकर’चा (ध्‍वनीवर्धकाचा) आवाज मोठा असल्‍याने बाळासाहेब घुले आणि त्‍यांचे कुटुंबीय यांनी आवाज न्‍यून करण्‍यास सांगितले.

संस्‍कार प्रतिष्‍ठान आणि अन्‍य संस्‍था यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने राबवलेल्‍या मोहिमेत चिंचवड (पुणे) येथील घाटावर १ सहस्र ८५३ श्री गणेशमूर्तींचे दान !

सामाजिक माध्‍यमांवरही दान घेतलेल्‍या श्री गणेशमूर्ती खाणीत फेकून देतांनाचे कित्‍येक ‘व्‍हिडिओ’ समोर येतात. दान घेतलेल्‍या मूर्तींचे होणारे श्री गणेशाचे विडंबन टाळण्‍यासाठी गणेशभक्‍तांनी मूर्तीदान करणे टाळावे !

अटक करण्यात आलेल्या मुसलमान आरोपीने पळण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांच्या गोळीबारात तो घायाळ !

हरदोई येथील श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करून परतत असणार्‍या एका अल्पवयीन हिंदु मुलीची छेड काढणारा महंमद अफझल याला पोलिसांनी अटक केली होती. त्याला न्यायालयात उपस्थित करण्यात आल्यानंतर त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद एकाच दिवशी आल्याने मडगाव आणि फोंडा (गोवा) पोलिसांकडून दक्षतेचे उपाय

अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक आणि ईदचा जुलूस शांततेने पार पडावा, यासाठी गोवा पोलिसांचे बैठका घेऊन आवाहन !

ठाणे जिल्‍ह्यात १८ सहस्र पोलिसांचा बंदोबस्‍त !

दोन्‍ही मिरवणुकांच्‍या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाणे, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण या सर्व भागांत १८ सहस्र पोलीस अधिकारी अन् कर्मचारी यांचा बंदोबस्‍त तैनात करण्‍यात येणार आहे.

श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीनिमित्त पुणे शहरातील मुख्‍य रस्‍ते वाहतुकीसाठी बंद !

वाहतूक पोलीस मुख्‍य विसर्जन मिरवणूक मार्गांसह परिसरातील इतर १७ रस्‍ते सर्व प्रकारच्‍या वाहतुकींसाठी सकाळी ७ वाजल्‍यापासून बंद ठेवणार आहेत, तर १० ठिकाणची वाहतूक इतर रस्‍त्‍यांना वळवण्‍यात आली आहे.