हिदूंनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अधिक तीव्रतेने प्रयत्न करायला हवेत ! – अधिवक्ता अतुल जेसवानी, संस्थापक आणि प्रदेशाध्यक्ष, हिंदू सेवा परिषद, मध्यप्रदेश

‘हिंदु राष्ट्र म्हणजे केवळ ज्याच्यावर आपली मालकी आहे, असा भूमीचा तुकडा नव्हे, तर ‘जेथे लव्ह जिहाद, गोहत्या, बलात्कार, धर्मांतर आदी होणार नाही’, असे राष्ट्र होय.

ख्रिस्ती धर्म प्राचीन असल्याचा खोटा प्रचार करून ख्रित्यांकडून  भारतात धर्मातर ! – एस्थर धनराज, सल्लागार, भारतीय स्वाभिमान समिती, तेलंगाणा

‘जोपर्यंत भारतातील भूभाग ख्रिस्त्यांसाठी देत नाही, तोपर्यंत त्यांच्याकडून हिंदूंचे धर्मातर चालू राहील’, अशा प्रकारे ख्रिस्ती मिशनर्‍यांचा प्रचार चालू आहे. असे असूनही ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर कोणतीही कारवाई होत नाही.

भारतातील इस्लामी अर्थव्यवस्था समजून घेऊन त्याविरोधात लढा दिला पाहिजे ! – ऋषी वशिष्ठ, अर्थशास्त्रज्ञ, देहली

कुठल्याही प्रकारची मोहीम राबवण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी धनाची आवश्यकता असते. धनाच्या माध्यमातून संघर्ष चालू केला जाऊ शकतो, त्याला पाठिंबा दिला जाऊ शकतो. हिंदूंनी ‘डिजिटल’ अर्थव्यवस्थेचा अभ्यास करून ती उभारली पाहिजे.

उद्योगपतींनी साधना केल्यास त्यांची व्यावहारिक आणि आध्यात्मिक उन्नती होईल ! – रवींद्र प्रभूदेसाई, संचालक, पितांबरी उद्योगसमूह

आज कलियुगामध्ये अर्थशक्तीचा अधिक प्रभाव आहे. तुमच्या आस्थापनातील कर्मचार्‍यांची ऐहिक आणि आध्यात्मिक उन्नती करून घेणे, ही तुमचे दायित्व आहे. त्यांच्याकडून साधना करवून घेतल्यामुळे आपला नफा वाढतो, तसेच हिंदु धर्माची सेवा होते.

छोट्या संघटनांना एकत्र करून हिंदुत्वाचे कार्य करायला हवे ! – पू. रामबालक दासजी महात्यागी महाराज, संचालक, श्री जामडी पाटेश्‍वरधाम सेवा संस्थान, पाटेश्‍वर धाम, छत्तीसगड

जे धर्मांतरित झाले त्यांना दूर न लोटता त्यांना प्रेमाने जवळ करायला हवे. असे केल्यास हिंदूंचे धर्मांतर होणार नाही. प्रभु श्रीराम यांनी वनवासाच्या काळात वानरांसह वनवासींना प्रेम देऊन आपल्या कार्यात जोडून घेतले. प्रभु श्रीरामांचा आदर्श घेऊन आपणाला कार्य करायचे आहे.

तानाजी मालुसरे यांचे १३ वे वंशज सुभेदार श्री. कुणाल मालुसरे यांचा सत्कार

नरवीर तानाजी मालुसरे यांचे १३ वे वंशज सुभेदार श्री. कुणाल मालुसरे यांचा सत्कार हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केला, तसेच ‘गड-दुर्ग संवर्धन मोर्चा’ आणि आगामी चित्रपट ‘सुभेदार’ यांचे व्हिडिओ दाखवण्यात आले.

गड-दुर्गांवरील इस्लामी अतिक्रमण हटवून तेथे पुन्हा भगवा फडकाण्यासाठी संघर्ष चालूच रहाणार ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

महाराष्ट्रातील शौर्याचे प्रतीक असलेल्या गड-दुर्गांवरील आक्रमण म्हणजे लँड जिहादचा प्रकार आहे. गड-दुर्गांमुळे छत्रपती शिवाजी महारांजांचे स्मरण होते. सध्याच्या स्थितीत तेथे मशीद, मजार, कबरी यांमुळे ‘ते मोगलांचे आहेत कि काय ?’, असे वाटते.

धर्मांतर रोखून सनातन धर्माचे रक्षण करू, अशी प्रतिज्ञा करा ! – पू. चित्तरंजन स्वामी महाराज, शांती काली आश्रम, अमरपूर, त्रिपुरा

मठ-मंदिरांमध्ये अनेक साधू-संत आहेत; परंतु तेथे येणार्‍या हिंदूंना धर्माचे शिक्षण दिले जात नसल्याने धर्मांतराची समस्या फोफावली आहे. हिंदु धर्म वाचला, तर मठ-मंदिरे टिकणार आहेत. त्यामुळे प्रथम हिंदु धर्म वाचवण्यासाठी प्रयत्न करा.

हिंदूंच्या प्रतीकांना आक्रमकांनी दिलेली नावे पालटणे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्य ! – दुर्गेश परूळकर, लेखक आणि व्याख्याते, ठाणे

औरंगजेब आपणाला प्रात:स्मरणीय नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज हे आपल्यासाठी प्रात:स्मरणीय आहेत. आपल्या पूर्वजांनी दिलेली नावे पालटण्यामागे आपली संस्कृती नष्ट करणे, हे आक्रमकांचे षड्यंत्र होते.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या काळात अन्‍य वर्तमानपत्रांनी दिलेली प्रसिद्धी !

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या काळात, म्‍हणजे १६ ते १९ जून या कालावधीत महाराष्‍ट्र आणि गोवा राज्‍यांतील अन्‍य वर्तमानपत्रांमध्‍ये मिळालेली प्रसिद्धी