वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात गीता प्रेसचे अभिनंदन आणि काँग्रेसचा निषेध !

गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथील गीता प्रेसला १०० वर्षे पूर्ण झाली. गीता प्रेसकडून हिंदूंच्‍या धर्मग्रंथांचे प्रकाशन करण्‍यात येते. या योगदानाविषयी केंद्रसरकारने गीता प्रेसचा ‘गांधी शांती पुरस्‍कार’ देऊन सन्‍मानित केले. याविषयी वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात गीता प्रेसच्‍या अभिनंदनाचा प्रस्‍ताव एकमताने पारित करण्‍यात आला.

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’ला उपस्‍थित हिंदुत्‍वनिष्‍ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट !

१६ ते २२ जून २०२३ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे अकरावे अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन (वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव) चालू आहे. या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट दिली अन् येथील कार्याची ओळख करून घेतली.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवामध्‍ये ‘हलाल सर्टिफिकेशन : वैश्‍विक अर्थव्‍यवस्‍थेवर आक्रमण’ या ई-पुस्‍तकाचे प्रकाशन !

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवामध्‍ये २०.६.२०२३ या दिवशी ‘कृपाल रूहानी फाऊंडेशन’चे कर्नल करतार सिंह मजीठिया यांच्‍या हस्‍ते ‘हलाल सर्टिफिकेशन : वैश्‍विक अर्थव्‍यवस्‍थेवर आक्रमण’ या ई-पुस्‍तकाचे प्रकाशन करण्‍यात आले.

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव’च्‍या चौथ्‍या दिवसातील पहिल्‍या सत्राचे सूक्ष्म परीक्षण

‘१९.६.२०२३ या दिवशी रामनाथ देवस्‍थान येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’त वक्‍त्‍यांनी मार्गदर्शन केले. त्‍या वेळी देवाने आमच्‍याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे. 

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या निमंत्रण पत्रिकेतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्‍याला विरोध करण्‍यासाठी सूक्ष्मातील अनिष्‍ट शक्‍तींनी तिच्‍यावर आक्रमण करणे

८.६.२०२३ या दिवशी वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या निमंत्रण पत्रिकेचे ‘युनिव्‍हर्सल ऑरा स्‍कॅनर’ या उपकरणाद्वारे संशोधन करण्‍यात आले. तेव्‍हा तिच्‍यामध्‍ये नकारात्‍मक ऊर्जा काहीच नसून १८४२ मीटर सकारात्‍मक ऊर्जा होती. १४.६.२०२३ या दिवशी पत्रिकेवर त्रासदायक स्‍पंदनांचे आवरण आल्‍याचे जाणवले.

राष्ट्राच्या उत्थानासाठी योग आणि अध्यात्म यांची आवश्यकता ! – डॉ. सत्यमेव जयते लोक मंगल, अध्यक्ष, सत्यमेव जयते

भारत स्वतंत्र झाल्यानंतर शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचार थांबलेला नाही. शासकीय कार्यालये, शाळा यांमध्ये योग आणि अध्यात्म यांचे शिक्षण दिल्यास भ्रष्टाचार रोखता येईल. अध्यात्म ही भारताची शक्ती आहे. शासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

छत्तीसगडमध्‍ये गेल्‍या ४ वर्षांत हिंदूंच्‍या धर्मांतरामध्‍ये वाढ ! – सौ. ज्‍योती शर्मा, प्रांत सहसंयोजक, हिंदु जागरण मंच, छत्तीसगड

कोणत्‍याही राज्‍यात होत नसेल, एवढे हिंदूंचे धर्मांतर छत्तीसगड राज्‍यात चालू आहे. यात मागील ४ वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. ख्रिस्‍ती धर्मप्रचारक पैसे आणि रेशन यांचे प्रलोभन देऊन महिलांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करत आहेत.

‘वन्दे भारत’ एक्सप्रेसवरील आक्रमणे आणि ‘कोरोमंडल’ एक्सप्रेसची दुर्घटना यांमागे जिहादी षड्यंत्र ! – आर्.एस्.एन्. सिंह, संरक्षणतज्ञ, देहली

बालासोरमध्ये भीषण रेल्वे अपघात होऊन त्यात ३०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. ३१ मार्च देहलीच्या शाहीनबागमधील एक धर्मांध केरळमध्ये गेला. तेथे त्याने अलपुझा-कन्नूर एक्सप्रेसमध्ये  पेट्रोल टाकून प्रवाशांना पेटवून दिले.हे ‘गझवा ए हिंद’ आहे. यालाच ‘जिहाद’ म्हणतात, असे मत त्यांनी व्यक्त केले

जिहादच्या विरोधात लढण्यासाठी हिंदूंनी शत्रूच्या हालचाली समजून घेणे आवश्यक ! – नीरज अत्री, अध्यक्ष, विवेकानंद कार्य समिती, हरियाणा

वारीमध्ये सहभागी झालेल्या मुसलमानाला विठ्ठलाचा महिमा सांगता आला असता; परंतु त्यांनी ‘अल्ला देवे, अल्ला दिलावे’, असे सांगितले. पश्चिम बंगाल, काश्मीर, केरळ यांसारख्या मुसलमान बहुसंख्य असलेल्या ठिकाणी ते हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे प्रकार करत नाहीत,असे ते म्हणाले

मंदिर परिसर ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यासाठी लढा देणार ! – वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात मंदिर विश्वस्तांचा निर्धार !

वस्त्रसंहिता लागू करण्यासह यापुढे मंदिर परिसर स्वच्छ आणि सात्त्विक रहावा, यासाठी तो ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यासाठी लढा दिला जाईल, असा निर्धार महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या कोअर समितीच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी दिली.