हिंदूंच्या प्रतीकांना आक्रमकांनी दिलेली नावे पालटणे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्य ! – दुर्गेश परूळकर, लेखक आणि व्याख्याते, ठाणे

‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ षष्ठम दिवस – मान्यवरांचे विचार

मोगलांतील एकाही बादशहाने कोणतेही मानवतेचे कार्य केलेले नाही. मोगल बादशहाची ओळख क्रूरतेसाठी आहे. उलट छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी राष्ट्र-धर्म आणि संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी कार्य केले आहे. ताजमहल हा तेजोमहल आहे, कुतुबमीनार हा विष्णुस्तंभ आहे, तर तथाकथित ज्ञानव्यापी मशीद हे भगवान शिवाचे मंदिर आहे. आक्रमकांनी दिलेली नावे, हे आक्रमकांचे उदात्तीकरण आहे.

श्री. दुर्गेश परूळकर

आपला इतिहास पराभवाचा नाही, तर विजयाचा आहे. शरद पवार यांना छत्रपती संभाजीनगरला ‘औरंगाबाद’ म्हणायचे असेल, तर त्यांनी अवश्य म्हणावे; परंतु माझ्यापुढे प्रश्‍न आहे की, ‘या राष्ट्राचा राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आहेत कि औरंगजेब आहे ?’ ‘छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने हाल करून मारले, हे योग्य होते का ?’  ‘शरद पवार यांच्या मनात छत्रपती संभाजी महाराज यांच्यापेक्षा औरंगजेब याच्याविषयी आदरभाव आहे का ?’ देश स्वतंत्र झाल्यानंतर आक्रमकांनी ठिकाणांना दिलेली नावे पालटणे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. औरंगजेब आपणाला प्रात:स्मरणीय नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज हे आपल्यासाठी प्रात:स्मरणीय आहेत. आपल्या पूर्वजांनी दिलेली नावे पालटण्यामागे आपली संस्कृती नष्ट करणे, हे आक्रमकांचे षड्यंत्र होते. त्यामुळे आक्रमकांनी दिलेली नावे पालटणे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे वक्तव्य ठाणे येथील लेखक आणि व्याख्याते श्री. दुर्गेश परूळकर यांनी वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सहाव्या दिवशी केले.