भारतातील इस्लामी अर्थव्यवस्था समजून घेऊन त्याविरोधात लढा दिला पाहिजे ! – ऋषी वशिष्ठ, अर्थशास्त्रज्ञ, देहली

अर्थशास्त्रज्ञ ऋषी वशिष्ठ

रामनाथ (फोंडा), २१ जून (वार्ता.) – भारतातील इस्लामी अर्थव्यवस्था समजून घेणे आवश्यक आहे. काश्मीरमधील केसरची शेती, हिमाचल प्रदेशमधील सफरचंदाची शेती, राजस्थानमधील खाण उद्योग, उत्तरप्रदेशमधील पान मसाला उद्योग, गुजरातमधील तेल उद्योग, कर्नाटकातील चंदनाची शेती, केरळमधील नारळाची शेती आदी रोखीची अर्थव्यवस्था संपूर्णतः मुसलमानांकडे आहे. हा केवळ योगायोग नसून सनातन हिंदु धर्म आणि हिंदू यांच्यावर केला जाणारा ‘प्रयोग’ (षड्यंत्र) आहे. त्यामुळे भारतातील ही इस्लामी अर्थव्यवस्था समजून घेतली पाहिजे, हिंदूंना समजावून सांगितली पाहिजे आणि त्याविरोधात लढा दिला पाहिजे, असे आवाहन देहली येथील अर्थशास्त्रज्ञ ऋषी वशिष्ठ यांनी वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सहाव्या दिवशी केले.

ते पुढे म्हणाले की,

१. कुठल्याही प्रकारची मोहीम राबवण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी धनाची आवश्यकता असते. धनाच्या माध्यमातून संघर्ष चालू केला जाऊ शकतो, त्याला पाठिंबा दिला जाऊ शकतो. हिंदूंनी ‘डिजिटल’ अर्थव्यवस्थेचा अभ्यास करून ती उभारली पाहिजे.

२. भारतातील मोठ्या २-३ मंदिरांची अर्थव्यवस्था ही भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा अधिक आहे. ९५ टक्के हिंदू मंदिरांमध्ये दान करतात. त्यांना या संघर्षात सहभागी करून घेता येऊ शकते. त्यांना संघटित करून राष्ट्रीय, प्रादेशिक आणि जिल्हास्तरीय न्यासाची स्थापना करून अशा हिंदूंना एका समान सूत्रात संघटित केल्यास इस्लामी षड्यंत्र रोखता येऊ शकते.

३. भारतातील मुसलमानांची संख्या वाढली असल्याचे सांगितले जाते. एखाद्या गावातील लोकसंख्या गणनेसाठी सरकारी अधिकारी जातात, तेव्हा एका घरी, एका मुसलमान पुरुषाच्या ३ बायका, १० मुले दाखवली जातात. दुसर्‍या घरी गेल्यावर तेच लोक कुटुंबात दाखवले जातात आणि त्या संख्येच्या आधारावर सरकारकडून अनुदान, अन्नधान्य घेतले जाते. तेच धान्य त्या गावातील हिंदूंना मुसलमानांनाकडून अधिक दराने विकले जाते. हेही अर्थव्यवस्थेच्या संदर्भातील एक षड्यंत्र आहे.

४. भारतात जेवढ्या ‘मॅट्रिमोनियल’ संकेतस्थळे (विवाह जुळवणारी संकेतस्थळे) आहेत, त्यांची ८० टक्के मालकी इस्लामी देशांकडे आहे. यामाध्यमातून लव्ह जिहादला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे हिंदूंनी स्वतःची ‘मॅट्रिमोनियल’ संकेतस्थळे चालू करायला हवीत.

५. आर्य चाणाक्य यांनी अर्थव्यवस्थेविषयी ३ सूत्रे सांगितली – भाव, स्वभाव आणि अभाव. भाव म्हणजे जन्माने आपण हिंदु आहोत, स्वभाव म्हणजे सांस्कृतिक दृष्टीने आपण सनातनी हिंदु आहोत; परंतु आपल्यात अभाव आहे, तो स्वतःच्या अर्थव्यवस्थेचा. भारतीय चलनावर छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु गोविंदसिंह यांचे चित्र असायला हवे, तेथे म. गांधी यांचे चित्र आहे, हाच अभाव आहे.