समान नागरी कायद्याशी धर्माचा संबंध जोडणे योग्य नाही ! – मोनिका अरोरा, अधिवक्ता, सर्वोच्च न्यायालय

प्रत्येकाला स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आणि स्वाभिमानी जीवन जगण्याचे अधिकार घटनेने दिले असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्त्या मोनिका अरोरा यांनी व्यक्त केले. येथे संभाव्य ‘समान नागरी कायदा’ या विषयावर अधिवक्त्या मोनिका अरोरा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या.

समान नागरी कायद्याच्या विरोधात विधी आयोगाला संदेश पाठवण्यासाठी मशिदीबाहेर लावण्यात आले ‘बार कोड’ !

किती हिंदू आणि त्यांच्या संघटना समान नागरी कायद्याला समर्थन देण्यासाठी अशा प्रकारचे प्रयत्न करत आहेत ?

मुसलमानांना विदेशातील सुरक्षेसंबंधीचे कठोर कायदे आणि नियम यांविषयी जाणीव करून देणे आवश्‍यक !

वास्‍तविक देशाच्‍या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्‍यक असलेल्‍या समान नागरी कायद्याविषयी विरोधकांचे प्रबोधन करणे आवश्‍यक आहे. यासह मुसलमानांना विदेशातील सुरक्षासंबंधीचे कठोर कायदे आणि नियम यांविषयी जाणीव करून दिली पाहिजे, असे मत महाराष्‍ट्र-गोवा बार कौन्‍सिलचे माजी सदस्‍य अधिवक्‍ता नंदू फडके यांनी व्‍यक्‍त केले.

साधू-संतांनी नेहमीच राजकारणापासून दूर राहिले पाहिजे ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

साधू-संतांनी राजकारणाकडे पाहूही नये. साधू-संतांना राजकारणापासून नेहमीच दूर राहिले पाहिजे. राजकारणात आल्याने मर्यादा येतात. साधूंना त्याचा प्रवास अमर्याद ठेवण्याची आवश्यकता आहे, असे विधान बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी ‘झी न्यूज’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिले.

(म्हणे) ‘समान नागरी कायदा हा शरिया कायद्याच्या विरोधात असेल, तर मुसलमानांना तो अमान्य !’ – जमियत उलेमा-ए-हिंद

‘समान नागरी कायदा संसदेत संमत होईल आणि तो सर्वांना मान्य करावाच लागेल’, अशी भूमिका आता सरकारने घेतली पाहिजे !

सनातन संस्थेच्या वतीने रत्नागिरी, लांजा, सावर्डे, चिपळूण आणि दापोली येथे  ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा !

प्रत्येक मानवाला त्याच्या यथोचित योग्यतेनुसार जीवन जगात आले पाहिजे यासाठी हिंदु राष्ट्र आणि समान नागरी कायद्याची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्र संकल्पनेचा उद्घोष सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेच करू शकतात.

डावे पक्ष राजकीय लाभासाठी समान नागरी कायद्याला हिंदु-मुसलमान वादाचे स्वरूप देत आहेत ! – काँग्रेसचा आरोप

काँग्रेसने दावा केला, की डावे पक्ष भाजपप्रमाणेच समाजात फूट पाडून हा कायदा लागू करण्यासाठी जातीय तणाव निर्माण करून ध्रुवीकरणाचा मार्ग अवलंबत आहेत.

समान नागरी कायद्याला विरोध करण्याचे आवाहन !

समान नागरी कायद्याविषयी कुठलीही संसद यात दुरुस्ती करू शकत नाही आणि केली तरी मुसलमान समाज मानणार नाही. तरी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी संकेतस्थळावर जाऊन स्वत:ची प्रतिक्रिया नोंदवावी अशा आशयाचा फलक लावण्यात आला आहे.

गोव्यात समान नागरी कायद्याला गेल्या ६० वर्षांत कुणाकडूनही विरोध नाही ! – मुख्यमंत्री 

काँग्रेस असो वा समाजवादी पक्ष, ते स्त्री-पुरुष समानता आणि महिला सक्षमीकरण यांची मागणी करत नाहीत. जर विरोधी पक्षाला या दोन्ही गोष्टी देशात लागू करायच्या असतील, तर त्यांनी समान नागरी कायद्याला पाठिंबा द्यावा.

(म्‍हणे) ‘समान नागरी कायदा झाल्‍यास परिणामांचा करणार अभ्‍यास !’

देशात समान नागरी कायदा लागू होण्‍याच्‍या शक्‍यतेवरून कायदा लागू झाल्‍यास होणार्‍या परिणामांच्‍या अभ्‍यासासाठी महाराष्‍ट्र काँग्रेसने समिती गठीत केली आहे.