समान नागरी कायद्याशी धर्माचा संबंध जोडणे योग्य नाही ! – मोनिका अरोरा, अधिवक्ता, सर्वोच्च न्यायालय

पुणे येथील ‘समान नागरी कायदा’ या विषयावरील व्याख्यान

मोनिका अरोरा, अधिवक्ता, सर्वोच्च न्यायालय

पुणे – राज्यघटनेत धर्माच्या स्वातंत्र्यापेक्षाही समानता, स्वातंत्र्य आणि शोषणाविरुद्धच्या हक्कांना सर्वोच्च स्थान दिले आहे. त्यामुळे महिलांच्या समान न्यायासाठी देशात समान नागरी कायदा महत्त्वाचा आहे. यात धर्माचा संबंध येत नाही. राष्ट्राला धर्म नाही. समान नागरी कायद्याशी धर्माचा संबंध जोडणे योग्य नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आणि स्वाभिमानी जीवन जगण्याचे अधिकार घटनेने दिले असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्त्या मोनिका अरोरा यांनी व्यक्त केले. येथे संभाव्य ‘समान नागरी कायदा’ या विषयावर अधिवक्त्या मोनिका अरोरा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या.