अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रशासनाने डोळ्यांत तेल घालून काम करावे ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नाशिक येथील दुर्घटनेचे सखोल अन्वेषण करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश, प्रत्येक मृताच्या कुटुंबियांसाठी ५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य घोषित
नाशिक येथील दुर्घटनेचे सखोल अन्वेषण करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश, प्रत्येक मृताच्या कुटुंबियांसाठी ५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य घोषित
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दळणवळण बंदी घोषित करण्याऐवजी ‘ब्रेक दि चेन’ या मोहिमेच्या अंतर्गत राज्यशासन कोरोनाविषयक निर्बंध अधिक कडक करण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या कडक निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर मंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
कोरोनाच्या किती किती लाटा येतील ? ते आज सांगू शकत नाही; मात्र आता राज्यातील उद्योगांनीसुद्धा येणार्या लाटेला तोंड देण्याच्या दृष्टीने आवश्यक ते नियोजन आतापासूनच करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १७ एप्रिल या दिवशी केले आहे.
रिक्शाचालक प्रत्येक मासात १० सहस्र रुपये कमवतात आणि त्यांना केवळ दीड सहस्र रुपये देऊन त्यांच्याही तोंडाला पाने पुसली आहेत. केवळ निर्बंध लादायचे आणि फारसे साहाय्यही करायचे नाही, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची भीती आहे.’’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांकडे पत्राद्वारे मागणी
जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत. याचा अर्थ तिथे नियम मोडले जात आहेत किंवा गर्दी होत आहे, असे दृश्य दिसता कामा नये, अन्यथा त्या सुविधा स्थानिक प्रशासनाने बंद कराव्यात, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
पुढचे १५ दिवस कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी (ब्रेक दि चेन) राज्यात १४४ कलम लागू करत आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ एप्रिलच्या रात्री केली. फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे १४ एप्रिल या दिवशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून अन्वेषण करण्यात येणार आहे. देशमुख यांना अन्वेषणासाठी समन्स दिले आहे.
१४ एप्रिल या दिवशी होणार्या मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दळणवळण बंदीची घोषणा करण्याची शक्यता आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘टास्क फोर्स’च्या बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.