मुंबई – हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे ३१ मार्च या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता बाळासाहेबांचे सुपुत्र आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमीपूजन आणि कोनशिला स्थापनेचा कार्यक्रम झाला. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे महाविकास आघाडीतील नेते उपस्थित होते. कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि बाळासाहेबांचे पुतणे अन् मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रित न केल्यामुळे भाजप आणि मनसे यांच्या नेत्यांकडून शिवसेनेवर टीका करण्यात येत आहे. दादर येथील शिवाजी पार्क परिसरातील महापौरांच्या जुन्या निवासस्थानी स्मारकाची वास्तू निश्चित करण्यात आली आहे.