
कुडाळ – तालुक्यातील ॐ श्री नवनाथ श्रद्धास्थान मुळदे येथील नवनाथ उपासक प.पू. श्री बाळकृष्ण महादेव घडशी महाराज यांच्या ‘तपोभूमी’ येथे कार्तिकस्वामी दर्शन सोहळा असणार आहे. कार्तिक पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र एकत्र असतांना स्त्रियांसाठी कार्तिकस्वामी दर्शनाचा योग असतो. यावर्षी रविवार, २९ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १२.४८ पासून ते सोमवार, ३० नोव्हेंबर या दिवशी सकाळी ६.३० वाजेपर्यंत हा योग असल्याने कार्तिकस्वामींचे दर्शन घेता येणार आहे. भाविकांना अभिषेक करायचे असल्यास त्यासाठी पुरोहितांची सोय केलेली आहे. या ठिकाणी येणार्या भाविकांनी वाहने रस्त्यावर न लावता वाहनतळामध्ये (पार्किंगच्या जागेत) लावावी, तसेच भाविकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत मास्क लावून आणि सुरक्षित शारीरिक अंतर ठेवून दर्शन घ्यावे, असे आवाहन प.पू. घडशी महाराज यांनी केले आहे.
मोकाट कुत्र्यांना आवरा !
अनधिकृत इमारती बांधणारा मुसलमान बांधकाम व्यावसायिक २ वर्षांनंतर अटकेत !
कर्जत बाजारपेठेत फेरीवाल्यांचे अतिक्रमण; सर्वसामान्यांना त्रास
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
मंचर (पुणे) येथे ११ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश !
‘महावितरण’च्या लाचखोर अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास पुणे येथे अटक !