पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटला भेट

कोरोनावरील लसनिर्मितीचा आढावा घेतला

सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला आणि अन्य वैज्ञानिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलतांना

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ नोव्हेंबर या दिवशी येथील सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. सिरम इन्स्टिट्यूट येथे कोरोनावर ‘कोव्हिशिल्ड’ या लस निर्मितीचे कार्य चालू आहे. मोदी यांनी येथे भेट देऊन लसीच्या निर्मितीकार्याचा आढावा घेतला. कोरोनावर भारतामध्ये संशोधन करून लस निर्माण करण्यात येथील सिरम इन्स्टिट्यूटने पुढाकार घेतला आहे. सिरम इन्स्टिट्यूट, एस्ट्रा झेनका, तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी संयुक्त विद्यमाने या लसीचे निर्मितीचे कार्य हाती घेतले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी ही लस ७० टक्के परिणामकारक आहे. येथे आतापर्यंत ४ कोटी डोसची निर्मिती करण्यात आली आहे.

हेलिकॉप्टरद्वारे सिरम इन्स्टिट्यूटमध्ये पोचल्यानंतर त्यांनी इन्स्टिट्यूटची पाहणी केली. या वेळी सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला आणि अन्य वैज्ञानिक उपस्थित होते.