वर्ष २०२१ मध्येही कोरोना कायम रहाणार ! – मनोवैज्ञानिक निकोलस ऑजुला यांची भविष्यवाणी

नवी देहली – वर्ष २०१८ मध्येच कोरोनाविषयीची भविष्यवाणी करणारे ३५ वर्षीय मनोवैज्ञानिक निकोलस ऑजुला यांनी वर्ष २०२१ मध्येही कोरोनाचा प्रभाव कायम रहाणार असल्याची नवी भविष्यवाणी केली आहे.

निकोलस यांनी वर्ष २०२१ साठी केलेली भविष्यवाणी

१. पुढील वर्षांत ‘पिग फ्लू’ नावाचा आणखी एक आजार जगात पसरेल. डुकरापासून होणार्‍या हा फ्लू संसर्गजन्य नसला, तरी जगाला तो त्रासदायक ठरणार आहे.
२. वर्ष २०२१ मध्ये जगभरात मोठ्या प्रमाणात विरोध, आंदोलन आणि निदर्शने होतील. ज्यामुळे अशांततेचे वातावरण असेल. ही स्थिती पुढील २-३ वर्षे असेल.
३. मी चांगले आयुष्य जगण्यासाठी सहस्रोच्या संख्येने लोकांना कुठेतरी जातांना पहात आहेत. याचा अर्थ अनेक ठिकाणी स्थलांतरे होऊ शकतात, असे म्हटले जात आहे.
४. ब्रिटनचे मंत्री ऋषि सुनक हे त्यागपत्र देऊ शकतात.
५. प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेते टॉम क्रूज यांचे आरोग्य बिघडू शकते. कदाचित् त्यांना हृदयाच्या संदर्भात आजार होऊ शकतो.
६. ब्रिटनचे राजपूत्र हॅरि यांची पत्नी मेगन या राजघराण्याविषयी काही गोपनीय गोष्टी उघड करत आहेत, असे निकलोस यांना दिसत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
७. एका मोठ्या नेत्याची हत्याही होऊ शकतो, असे निकोलस यांनी म्हटले असले, तरी त्यांनी त्या नेत्याचे नाव सांगितलेले नाही.