दुबई आणि अबू धाबी विमानतळांवर भारतीय पर्यटकांसाठी कठोर नियम लागू !

संयुक्त अरब अमिराती सरकारने विमान आस्थापनांनाही ताकीद दिली आहे की, जर त्यांच्या विमानातून अटी पूर्ण  न केलेले पर्यटक आले, तर त्यांना दंड आकारला जाईल.

सातारा महाबळेश्वर राज्य महामार्गावर अनेक होर्डिंग्ज अनधिकृत !

होर्डिंग्ज कोणत्याही क्षणी पडून दुर्घटना होऊ शकते , त्यामुळे या महामार्गावरील अनधिकृत होर्डिंग्ज तातडीने काढून घेण्यात यावीत, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

चीनधार्जिणा मालदीव भारताचे ‘रुपे कार्ड’ ही सेवा चालू करणार !

चीनच्या तालावर नाचून भारताशी शत्रूत्व ओढवून घेणार्‍या मालदीवला आता भारतानेही ‘रुपे कार्ड’ सेवा चालू करण्यास विरोध करून त्याला त्याची जागा दाखवून दिली पाहिजे !

Gopi Thotakura  Space Tourist : पर्यटक म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय ठरले गोपी थोटाकुरा !

गेल्या २-३ वर्षांपासून अमेरिकेत ‘अंतराळ पर्यटना’वर भर दिला जात आहे. विशेषतः खासगी आस्थापनांत यासाठी चढाओढ चालू आहे.

Sri Lanka Tourism Indians:श्रीलंकेत पर्यटनासाठी जाणार्‍या भारतियांच्या संख्येत २५० टक्के वाढ !

मालदीवने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान केल्यामुळे त्याला ते चांगलेच भोवले आहे. भारतियांनी मालदीववर बहिष्काराचे अस्त्र उगारल्याचा लाभ शेजारील श्रीलंकेला झाला.

Ministry of External Affairs : परराष्ट्र मंत्रालयाने संमत केलेल्या मध्यस्थांवर (एजंटवर) विश्‍वास ठेवा !

कंबोडियातील भारतीय दूतावासाने कंबोडियात नोकरीसाठी जाणार्‍या भारतियांसाठी मार्गदर्शक सूचना प्रसारित केली आहे. नोकर्‍यांच्या संदर्भात फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर येत असल्याने या सूचना प्रसारित करण्यात आल्या आहेत.

जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांतील चित्रे आणि कलाकृती पाहून दक्षिण कोरियाचे शिष्टमंडळ भारावून गेले !

अभिनेता गगन मलिक यांनी जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांना १ मे या दिवशी भेट दिली. या वेळी त्यांच्यासमवेत दक्षिण कोरियाचे शिष्टमंडळ आणि थायलंडचे कलाकारही होते.

 रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांमध्ये १० वर्षांत १९ पर्यटनस्थळांची वाढ

जिल्ह्यातील स्थानिक नागरी आणि ग्रामीण भागांतील प्रसिद्ध निसर्गरम्यस्थळे, सांस्कृतिक, ऐतिहासिक स्थळांसह प्रसिद्ध यात्रास्थळे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी जोरदार नियोजन चालू आहे.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ‘आध्यात्मिक पर्यटना’च्या दृष्टीने जागतिक पर्यटन संस्थांशी साधला संवाद !

गोवा पर्यटन खात्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट २०२४’ या कार्यक्रमात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे प्रतिनिधी सहभागी झाले. हा कार्यक्रम ताळगाव येथील ‘डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम’मध्ये आयोजित करण्यात आला होता.

Palasnath Temple : ४६ वर्षे पाण्यात राहूनही सुस्थितीत असलेल्या उजनी जलाशयातील पळसनाथ मंदिराकडे पर्यटकांचे पाय वळले !

१ सहस्र वर्षापूर्वी हेमाडपंती पद्धतीचे बांधकाम असलेले श्री पळसनाथ मंदिराचे शिखर प्राचीन इतिहासाची साक्ष देत असून गेल्या ४६ वर्षांपासून पाण्यात तग धरून उभे आहे.