China Threatened India Indirectly : मालदीवच्या अंतर्गत प्रकरणात कोणत्याही देशाने हस्तक्षेप केल्यास चीन विरोध करील !

चीनची भारताला अप्रत्यक्ष धमकी !

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू

बीजिंग (चीन) : मालदीवच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये एखाद्या देशाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला चीन पूर्ण शक्तीनिशी विरोध करील, असे आश्‍वासन चीनने मालदीवला दिले आहे. यावरून चीनने अप्रत्यक्षपणे भारताला धमकी दिली आहे. सध्या मालदीवचे राष्ट्रपती महंमद मुइज्जू चीनच्या दौर्‍यावर आहेत. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी मुईज्जू यांची भेट झाल्यानंतर चीनने वरील आश्‍वासन दिले. दोन्ही देशांमध्ये २० करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या आहेत.

(सौजन्य : Tv9 भरतवर्ष)

मालदीवने चिनी पर्यटकांना मालदीवला पाठवण्याची विनंती केली आहे. सध्या भारत आणि मालदीव यांच्यात पर्यटनावरून तणाव निर्माण झाला आहे. मालदीवच्या मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यानंतर भारतियांनी मालदीववर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.

चीन सरकारचे मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने चीन आणि मालदीव यांच्या संयुक्त निवेदनावर म्हटले आहे की, चीन मालदीवचे सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय अस्मिता यांना कायम ठेवण्यासाठीच्या सर्व प्रयत्नांना पूर्ण साहाय्य करील. तसेच मालदीवच्या अंतर्गत प्रकरणांत विदेशी हस्तक्षेपांचा विरोध करील. चीन मालदीवशी असलेल्या धोरणांचा दृढतेने पालन करील.