दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

१२ ते १८ जून २०२२ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली अन् येथील कार्याची ओळख करून घेतली.

अधिवेशनामुळे हिंदु राष्ट्र निर्मितीच्या विचाराला मोठे बळ प्राप्त होईल ! – प.पू. भास्करगिरी महाराज, देवगड

सर्व सुविचारांची देवाण-घेवाण होणार आहे आणि ‘हिंदु राष्ट्र निर्मिती’च्या विचाराला पुष्कळ मोठे बळ प्राप्त होणार आहे. या अधिवेशनासाठी आमच्या श्रीक्षेत्र दत्त देवस्थान, देवगडच्या माध्यमातून शुभेच्छा व्यक्त करतो.

अंती होईल स्थापना ईश्वरी राज्याची ।

विरोध करती हिंदु अधिवेशनाला। राष्ट्र-धर्म कार्याला । ते राष्ट्र-धर्म द्रोही ।। १ ।।
बरोबरच आहे, सिद्ध होते यातून अधर्माला धर्म मान्य नाही ।

भारत हिंदु राष्ट्र व्हावे, हेच या अधिवेशनाचे स्वप्न ! – प.पू. शांतीगिरी महाराज, संभाजीनगर

भारत हिंदु राष्ट्र व्हावे, हेच या अधिवेशनाचे स्वप्न आहे. हा देश केवळ हिंदु राष्ट्रच नाही, तर विश्वगुरु बनू शकतो; कारण आपल्या देशात भारतमातेने अशा सुपुत्रांना जन्माला घातले आहे की, ज्यांच्या सामर्थ्याची आपण कोणतीही तुलना करू शकत नाही.

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात १७ जून या दिवशी चर्चिले जाणारे विषय

उद्बोधन सत्र : विदेशी हिंदूंचे रक्षण, ईशान्य भारत आणि विदेशी हिंदू यांचे रक्षण,दैवी बालकांविषयी संशोधन

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या तृतीय दिवसाचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण

१४.६.२०२२ या दिवशी गोवा येथील ‘श्री रामनाथ देवस्थाना’मध्ये दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या तृतीय दिवशी अधिवेशनाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या वेळी श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मध्ये सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेले नामजपादी उपाय

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणे, म्हणजे ‘रामराज्य स्थापन’ करण्यासाठी प्रयत्न करणे ! या कलियुगात असे प्रयत्न करणे कठीण आहे. यासाठी वाईट शक्तींविरुद्ध लढा द्यावा लागतो. दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये कशा बुद्धीअगम्य अडचणी आल्या आणि त्यांवर नामजपादी उपायांनी कशी मात केली ? हे येथे दिले आहे.

VIDEO : आदर्श चरित्र निर्माण करणारे शिक्षण आवश्यक ! – पू. (डॉ.) शिवनारायण सेन, उपसचिव, शास्त्र धर्म प्रचार सभा, बंगाल

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ‘हिंदूंची शिक्षण प्रणाली’ या विषयावर विचारमंथन

VIDEO : आपत्काळात हिंदु समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन हिंदूंच्या रक्षणासाठी कार्य करायला हवे ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आपत्काळात हिंदु समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन हिंदूंच्या रक्षणासाठी हे कार्य करायला हवे. असेे करणे म्हणजे समाजऋण फेडण्यासारखेच आहे आणि यातून आपली साधनाही होणार आहे.

‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हेच युवकांचे ‘करिअर’ असायला हवे ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

धर्मकार्यामध्ये योगदान देणारे युवक निर्माण व्हावेत, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्रवीर’ निर्माण करण्याचे कार्य चालू आहे.