‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मध्ये सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेले नामजपादी उपाय

‘हिंदु जनजागृती समिती’ने १२ ते १८ जून २०२२ या कालावधीत गोव्यातील रामनाथी, फोंडा येथील ‘श्री रामनाथ देवस्थान’च्या सभागृहात आयोजित केलेले ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ म्हणजे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी होत असलेले भारतभरातील हिंदुत्वनिष्ठांचे संघटित प्रयत्न होत. वर्ष २०१२ पासून हिंदु जनजागृती समितीचे संत आणि साधक यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणे, म्हणजे ‘रामराज्य स्थापन’ करण्यासाठी प्रयत्न करणे ! या कलियुगात असे प्रयत्न करणे कठीण आहे. यासाठी वाईट शक्तींविरुद्ध लढा द्यावा लागतो. वाईट शक्ती दिसत नसल्याने आपल्याला येत असलेल्या अडचणींचे कारण स्थुलातून कळत नाही. त्याला सूक्ष्म दृष्टीच लागते आणि अडचणी दूर करण्यासाठी नामजपादी उपायच करावे लागतात. या अधिवेशनात कशा बुद्धीअगम्य अडचणी आल्या आणि त्यांवर नामजपादी उपायांनी कशी मात केली ? हे येथे दिले आहे.


सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

सूक्ष्मातील लढ्याच्या उदाहरणांतून साधनेचे महत्त्व लक्षात घ्या !

‘या लेखामध्ये सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर तांत्रिक अडचणी सुटण्याच्या संदर्भात त्यांना आलेले अनुभव दिले आहेत. हे वाचल्यावर लक्षात येते की, स्थुलातील कार्य करतांना स्थुलातून कितीही काळजी घेतली, तरी त्यावर सूक्ष्म जगतातील वाईट शक्तींचा परिणाम होत असतो. वाईट शक्तींमुळे कार्यात निर्माण झालेले अडथळे दूर करण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपायच आवश्यक असतात. त्यासाठी तितकी साधनाही करणे आवश्यक असते. हिंदूंनो, आगामी तिसऱ्या महायुद्धाच्या काळात अशा स्वरूपाच्या अडचणी आल्यास त्यावर सूक्ष्म स्तरावरील उपाययोजना काढण्यासाठी कोणी मिळणार नाही. त्या वेळी कार्य नीट होण्यासाठी आताच स्वतःची साधना वाढवा !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.६.२०२२)

१२.६.२०२२ – अधिवेशनाचा पहिला दिवस

१. अधिवेशनात सकाळी ९ पासून विद्युत् प्रवाह खंडित केला जाणार असल्याचे समजणे आणि या अडचणीवर नामजपादी उपाय केल्यावर ती दूर होणे : गोव्यातील फोंडा येथील ‘श्री रामनाथ देवस्थान’च्या सभागृहात अधिवेशनाला सकाळी ९.३० वाजता आरंभ होणार होता. त्या पूर्वी सकाळी ८.३० वाजता देवस्थानाकडून कळले, ‘काही कामानिमित्त अधिवेशनस्थळाचा वीजपुरवठा सकाळी ९ पासून खंडित केला जाणार आहे.’ आम्ही त्यांना विनंती केली की, कृपया हे काम अधिवेशनानंतर करावे किंवा आम्हाला पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा. ‘यांपैकी काय ग्राह्य होईल ?’, हे आम्हाला समजत नव्हते. त्यामुळे ही अचानक आलेली वीजपुरवठ्यातील अडचण सुटण्यासाठी नामजपादी उपाय करण्यास मला सकाळी ९ वाजता सांगण्यात आले. मी उपाय शोधले असता मला ‘ओठांसमोर उजव्या हाताचा तळवा धरून ‘शून्य’ हा जप करणे’, हा उपाय देवाने सुचवला. मी त्याप्रमाणे उपायाला प्रारंभ केला आणि ३० मिनिटे हा उपाय केला, तसेच अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी मधून मधून प्रार्थनाही केली. देवाच्या कृपेने विद्युत् प्रवाह खंडित झाला नाही आणि अधिवेशनाला सकाळी ९.३० वाजता आरंभ झाला. यावरून लक्षात आले, ‘नामजपादी उपाय केल्यास लोकांमध्ये सकारात्मक परिवर्तन होऊ शकते. ईश्वरच हे समष्टी साधनेला पूरक असे परिवर्तन घडवून आणतो.’

२. डावीकडून त्रासदायक शक्ती येत असल्याने संकलित केलेले अधिवेशनाचे चित्रीकरण ‘यू ट्यूब’ आणि ‘फेसबूक’ यांवर ‘अपलोड’ करणाऱ्याच्या संगणकाकडे येऊ न शकणे आणि ‘निर्गुण’ हा नामजप केल्यावर, तसेच विभूती फुंकल्यावर तो अडथळा दूर होणे : अधिवेशनाचे चित्रीकरण करून ते ‘यू ट्यूब’ आणि ‘फेसबूक’ यांद्वारे सर्वांना दाखवण्याचे नियोजन करण्यात आले होते. ध्वनीचित्रीकरण करणारे साधक हे चित्रीकरण करत होते आणि ते त्याच वेळी (ऑनलाईन) संकलित करत होते. ‘यू ट्यूब’ आणि ‘फेसबूक’ यांवर ‘अपलोड’ करणारा साधकांचा गट वेगळा होता. या गटाकडे संकलित केलेले अधिवेशनाचे चित्रीकरण ‘केबल’द्वारे त्याच वेळी पाठवण्यात येत होते. ही सर्व ‘ऑनलाईन’ प्रक्रिया होती. त्यामुळे त्यात खंड पडून उपयोग नव्हता; कारण अधिवेशनाचे थेट (लाईव्ह) प्रसारण होत होते. मला सकाळी ११ वाजता निरोप मिळाला, ‘अपलोड’ करणाऱ्या साधकांना संकलित केलेले चित्रीकरण सलग मिळण्यात अडचण येत आहे.’ ‘ही अडचण कशामुळे येत आहे ?’, हे मी सूक्ष्मातून जाणून घेतले असता मला लक्षात आले, ‘संगणकावर ही सेवा करणाऱ्या साधकाच्या डावीकडून त्रासदायक शक्ती येत आहे. अनिष्ट शक्ती हा अडथळा निर्माण करत होत्या. ती त्रासदायक शक्ती नष्ट करण्यासाठी मी ‘निर्गुण’ हा नामजप करत १५ मिनिटे उपाय केले आणि मी त्या दिशेला विभूतीही फुंकली. तेव्हा मला त्यात गुरुकृपेने यश आले. त्यानंतर संकलित केलेले चित्रीकरण संगणकावर येण्यातील अडथळा दूर झाला. तेव्हा मी कृतज्ञता व्यक्त केली.

३. एक हिंदुत्वनिष्ठ संत थकलेले दिसणे, त्यांच्यासाठी नामजपादी उपाय केल्यावर त्यांना होत असलेला त्रास दूर झाल्याचे जाणवणे : एक हिंदुत्वनिष्ठ संत थकलेले दिसत होते. त्यामुळे मला त्यांच्यासाठी नामजपादी उपाय करण्यास सांगण्यात आले. मला त्यांच्या कपाळावर त्रासदायक शक्तीचे आवरण जाणवले. मी त्यांच्यासाठी कपाळावर तळहात ठेवून ‘निर्गुण’ हा नामजप केला. हे उपाय २५ मिनिटे केल्यावर मला त्या संतांना होत असलेला त्रास दूर झाल्याचे जाणवले. मी विश्वातील चैतन्यशक्ती आणि प्राणशक्ती यांना प्रार्थना केली, ‘तुमचा प्रवाह त्या संतांच्या मस्तकावर पडू दे आणि त्यांचा देह, तसेच कुंडलिनीचक्रे चैतन्यमय अन् प्राणशक्तीमय होऊ देत.’ माझ्या प्रार्थनेप्रमाणे चैतन्यशक्ती आणि प्राणशक्ती यांनी कार्य केल्याचे मला जाणवले. यासाठी मी विश्वातील चैतन्यशक्ती आणि प्राणशक्ती यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

१३.६.२०२२ – अधिवेशनाचा दुसरा दिवस

१. अधिवेशनासाठी उपस्थित असलेल्यांना ‘इंटरनेट’ मिळण्यात अडचण येणे, तेव्हा ‘इंटरनेट’ मिळण्यासाठीच्या उपकरणावर त्रासदायक शक्तीचे आवरण आलेले जाणवणे आणि विभूती फूंकून अन् ध्यान लावून नामजपादी उपाय केल्यावर उपकरणावरील आवरण दूर झाल्याने ‘इंटरनेट’ मिळू लागणे : सभागृहात अधिवेशनासाठी उपस्थित असलेल्यांना ‘इंटरनेट’ मिळण्यासाठी अधिवेशनस्थळी एक व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी ९.३० वाजता अधिवेशनाला आरंभ झाल्यावर अधिवेशनात उपस्थित असलेल्यांना ‘इंटरनेट’ जोडणी मिळत नव्हती. मला त्याविषयी सांगण्यात आले. ‘इंटरनेट’ मिळण्यासाठी जे उपकरण होते, तेथे मी गेलो. त्या वेळी मला त्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण आलेले जाणवले; म्हणून मी माझ्याकडील विभूती उपकरणावर फुंकली आणि ध्यान लावून त्या उपकरणासाठी नामजपादी उपाय केले. १० मिनिटे उपाय केल्यावर त्या उपकरणावरील आवरण दूर झाल्याचे मला जाणवले. तेव्हा मी ‘इंटरनेट’ मिळण्यातील अडचण दूर झाली का ?’, हे बघण्यास सांगितले. त्या वेळी ती अडचण दूर झाली होती. त्यामुळे मी श्री गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त केली.

२. अधिवेशनाचा चित्रीकरण केलेला ‘डाटा’ ‘करप्ट’ होणे, ही अडचण त्या सेवेच्या ठिकाणी भूमीतून त्रासदायक शक्ती येत असल्याने, तसेच ‘इंटरनेट’ उपकरणावर त्रासदायक शक्ती येत असल्याने आलेली असणे आणि त्यावर विभूती फुंकणे अन् नामजप करणे, हे उपाय केल्यावर ती अडचण सुटणे : अधिवेशनात जी भाषणे व्हायची, त्या भाषणाचे चित्रीकरण संगणकात घेण्यासाठी पद्धत ठरवली होती. प्रत्येक वक्त्याच्या चित्रीकरणाचा ‘डाटा’ साधारण २० जी.बी. व्हायचा. हा ‘डाटा’ ‘संगणकात ‘कॉपी’ व्हायला १० ते १२ मिनिटे लागायला हवी. या दिवशी सकाळी १० वाजता या सेवेमध्ये अडचणी येऊ लागल्या. ‘डाटा’ ‘कॉपी’ होण्यासाठी २० ते २५ मिनिटे लागू लागली. तसेच ‘कॉपी’ झालेला ‘डाटा’ ‘करप्ट’ झालेला असायचा. त्यामुळे त्या ‘डाटा’चा काही उपयोग नसायचा.

या अडचणी साधकांनी मला सांगितल्यावर मी ही सेवा चालू होती, तेथे गेलो. तेव्हा मला जाणवले, ‘ज्या पटलावर ही सेवा साधक करत होते, त्या पटलाखालील भूमीतून वाईट शक्ती त्रासदायक शक्ती प्रक्षेपित करत आहेत. त्यामुळे मी पटलाखालील भूमीवर विभूती फुंकली. तसेच ५ मिनिटे ‘महाशून्य’ हा नामजप केला. त्यामुळे पटलाखालील भूमीतून त्रासदायक शक्ती प्रक्षेपित होणे थांबले. मग मला जाणवले, ‘या सेवेसाठी जी ‘इंटरनेट’ जोडणी केली होती, त्या उपकरणावर त्रासदायक शक्ती एका दिशेकडून येत आहे.’ त्यामुळे मी त्या दिशेला विभूती फुंकली आणि १० मिनिटे ‘निर्गुण’ हा नामजप केला. हा उपाय केल्यावर त्या उपकरणामध्ये चैतन्य जाणवू लागले. त्यानंतर तेथील साधकांनी पुन्हा चित्रीकरणाचा ‘डाटा’ संगणकात ‘कॉपी’ करण्यासाठी लावल्यावर तो व्यवस्थित गतीने ‘कॉपी’ होऊ लागला, तसेच ‘कॉपी’ झालेला ‘डाटा’ व्यवस्थितही होता. त्यामुळे सर्व अडचणी सुटल्या होत्या.

३. अधिवेशनाचा चित्रीकरणाचा ‘डाटा’ संगणकात ‘कॉपी’ होण्यास पुन्हा अधिक वेळ लागू लागणे, तेव्हा ती सेवा करत असलेल्या साधकांसमोर त्रासदायक शक्तीचा पडदा वाईट शक्तींनी निर्माण केलेला असणे आणि त्या वेळी उजव्या हाताचा तळवा त्रासदायक शक्तीचा पडदा असलेल्या दिशेने करून ‘निर्गुण’ हा नामजप केल्यावर तो त्रास दूर होणे : सकाळी ११.३० वाजता चित्रीकरणाचा ‘डाटा’ संगणकात ‘कॉपी’ होण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक वेळ लागत असल्याची अडचण पुन्हा आली. तेव्हा मला जाणवले, ‘ही सेवा साधक करत आहेत, तेथे त्यांच्या समोर त्रासदायक शक्तीचा पडदा वाईट शक्तींनी निर्माण केला आहे आणि त्यामुळे साधकांना ती अडचण येत आहे.’ मी माझ्या उजव्या हाताचा तळवा त्रासदायक शक्तीचा पडदा असलेल्या दिशेने करून ‘निर्गुण’ हा नामजप करू लागलो. हा उपाय मी १५ मिनिटे केल्यावर तो त्रासदायक शक्तीचा पडदा नष्ट झाला. त्यानंतर अधिवेशनाचा चित्रीकरणाचा ‘डाटा’ व्यवस्थित गतीने ‘कॉपी’ होऊ लागल्याचे साधकांनी सांगितले.

(क्रमश:)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/589232.html

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१५.६.२०२२)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक