विरोध करती हिंदु अधिवेशनाला ।
राष्ट्र-धर्म कार्याला ।
ते राष्ट्र-धर्म द्रोही ।। १ ।।
बरोबरच आहे, सिद्ध होते
यातून अधर्माला धर्म मान्य नाही ।
बळ एकवटून सारे
विरोध तुम्ही कराल ।
पण लक्षात घ्या
धर्मशक्ती आहे मोठी ।
त्यामुळे निश्चितच पराभव तुम्ही पत्कराल ।। २ ।।
अहंकारी बुद्धीला तुमच्या, जरा शहाणपण शिकवा ।
उगाच हवेत उडता, जरा भूमीला पाय लावा ।। ३ ।।
ईश्वरानेच केली आहे, तुमचीही निर्मिती ।
तरीही असे वागता त्याच्याशीच, करता अनीती ।। ४ ।।
अंती होईल स्थापना ईश्वरी राज्याची ।
गुढी उभारतील सारे आनंद अन् मांगल्याची ।। ५ ।।
– कु. स्वाती गायकवाड (आताच्या सौ. स्वाती संदीप शिंदे)(आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (जून २०२०)